मणीभवन
Appearance
(मणिभवन या पानावरून पुनर्निर्देशित)
मणीभवन हे महात्मा गांधी आपल्या मुंबईतील वास्तव्यात ज्या इमारतीत राहात असत त्या इमारतीचे नाव आहे. आता या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला असून महात्मा गांधींच्या वापरातील वस्तूंचे एक संग्रहालयही तेथे स्थापन करण्यात आले आहे.[१]
भौगोलिक स्थान
[संपादन]मुंबई शहरातील गावदेवी भागात लेबरनम रस्ता परिसरात ही वास्तू आहे.
महत्त्व
[संपादन]महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे या वास्तूचे विशेष महत्त्व मानले जाते. इ स. १९१७ ते १९३४ या काळातील विविध ऐतिहासिक घडामोडी येथे घडलेल्या आहेत.याच ठिकाणी आता संग्रहालय आणि गांधीजी यांच्यासंबंधी प्रदर्शन मांडलेले आहे. गांधीजींच्या कार्याचा त्याद्वारे परिचय करून घेता येतो.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ "महात्मा गांधी के प्रशंसक हैं तो एक बार इन जगहों पर जरूर जाएं, घूमने के साथ-साथ बापू से जुड़ी मिलेंगी कई जानकारी". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
- ^ "esakal | मुंबईत आहेत १० प्रसिद्ध संग्रहालये; तुम्हाला माहित आहे का याविषयी?". www.esakal.com. 2021-10-02 रोजी पाहिले.