शिवाजी मंदिर
Jump to navigation
Jump to search
श्री शिवाजी मंदिर हे दादर, मुंबई येथील प्रसिद्ध नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाची व्यवस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ या न्यासाकडे आहे. या नाट्यगृहाचे उद्घाटन ३१ डिसेंबर १९४३ रोजी झाले. दादर(पश्चिम)मधील प्लाझा या चित्रपटगृहाच्या हे बरोब्बर समोर आहे. हे एक बंदिस्त सभागृह असून वातानुकूलित आहे. नाट्यगृहातील रंगमंचाचा आकार ३० X ४० फूट आहे. रंगमंचासमोरचा व्हेलव्हेटचा मोठा दर्शनी पडदा ३० X १२ फुटाचा आहे. नाट्यगृहाच्या आसनक्षमतेनुसार या प्रेक्षागृहात १०३२ प्रेक्षक बसू शकतात. शिल्पे आणि चित्रे मांडायची सोय असलेले एक कलादालन नाट्यगृहाला जोडूनच आहे.हे नाट्यगृह प्रसिद्ध रंगकर्मी डॉ.काशिनाथ घाणेकर ह्यांचे होम ग्राउंड समजले जात असे.
शिवाजी मंदिरच्या आवारात नाटकांत काम करण्यासाठी येणाऱ्या कलाकारांच्या राहण्याची सोय नाही.