फत्तेपूर सिक्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फत्तेपूर सिक्री येथील दिवाने-खास

फत्तेपूर सिक्री हे मुघल सम्राटांनी अकबराने आग्र्याजवळ सीक्री या खेडयाजवळ नवीन राजधानी १५६९-७० मध्ये वसविली. आपल्या गुजरातवरील विजयानंतर त्याने त्यास फत्तेपूर सीक्री हे नाव दिले. हे शहर मुघल शहरी स्थापत्याचे उदाहरण समजले जाते. सध्या या शहराचे अवशेष शिल्लक असून पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे. १८ व्या शतकात हे शहर काही कारणांमुळे निर्जन झाले. येथील बुलंद दरवाजा सर्वात भव्य आहे. अकबराने गुजरातच्या विजयाप्रीत्यर्थ ही वास्तु दक्षिणाभिमुख बांधली होती. या दरवाजाची उंची ५४ मी. असून तो लाल दगडात बांधलेला आहे. दवाजाच्या आत गेल्यावर सलीम चीस्तीची कबर आहे. त्या भोवतालच्या संगमरवरी भिंतींवर अतिशय सुंदर जाळीदार नक्षीकाम आहे.


महत्वाच्या इमारती[संपादन]

  • बुलंद दरवाजा
फत्तेपूर सिक्री येथील बुलंद दरवाजा
  • दिवाने-आम
  • दिवाने-खास
  • सलिम खिस्ती ची दर्गा


बाह्य दुवे[संपादन]