Jump to content

मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.
नव्या लोकल गाड्या

मध्य हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग ठाणे, डोंबिवली, कल्याण इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. कल्याण येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा कसाऱ्यामार्गे नाशिककडे तर आग्नेय फाटा कर्जतमार्गे पुण्याकडे धावतो.

दादर आणि परळ रेल्वे स्थानक मध्य व पश्चिम दोन्ही मार्गांवर असल्यामुळे तेथे मार्ग बदलणे शक्य होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकुर्ला ह्या स्थानकांवरून हार्बर मार्गाद्वारे प्रवासाची सोय उपलब्ध आहे.

स्थानके

[संपादन]

(जलद लोकल केवळ ठळक अक्षरांमधील स्थानकांवरच थांबतात.)

मुख्य मार्ग

[संपादन]
# छशिमटपासून अंतर (किमी) स्थानक नाव स्थानक कोड
1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT / ST
2 मशीद
3 सँडहर्स्ट रोड
4 भायखळा BY
5 चिंचपोकळी
6 करी रोड
7 परळ PR
8 दादर D
9 ११ माटुंगा
10 १३ शीव
11 १५ कुर्ला C
12 १८ विद्याविहार
13 २१ घाटकोपर G
14 २३ विक्रोळी
15 २५ कांजुर मार्ग
16 २६ भांडुप
17 २८ नाहूर
18 ३२ मुलुंड
19 ३४ ठाणे T
20 ३६ कळवा
21 ४० मुंब्रा
22 ४३ दिवा जंक्शन
23 ४७ कोपर
24 ४८ डोंबिवली DI
25 ५० ठाकुर्ली
26 ५३ कल्याण जंक्शन K

मुख्य मार्ग फाटे

[संपादन]

आग्नेय उपमार्ग

[संपादन]
# स्थानक नाव स्थानक कोड
1 कल्याण जंक्शन K
2 विठ्ठलवाडी
3 उल्हासनगर
4 अंबरनाथ A
5 बदलापूर BL
6 वांगणी
7 शेलू
8 नेरळ जंक्शन
9 भिवपुरी रोड
10 कर्जत S
11 पळसधरी
12 केळवली
13 डोळवली
14 लौजी
15 खोपोली KP

ईशान्य उपमार्ग

[संपादन]
# स्थानक नाव स्थानक कोड
1 कल्याण जंक्शन K
2 शहाड
3 आंबिवली
4 टिटवाळा TL
5 खडवली
6 वाशिंद
7 आसनगाव AN
8 आटगाव
9 तानशेत
10 खर्डी
11 उंबरमाळी
12 कसारा N