लाल किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लाल किल्ला दिल्लीतील मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल संगमरवरी दगडावरून दिलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी आहे.

बांधकाम[संपादन]

मुघल सम्राट शाहजहानने हा किल्ला १६३८ इस ला बांधून घेण्यास सुरु केले व तो १६४८ इस मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा जगातील भव्य राजवाडयापैकी एक आहे. भारताच्या इतिहासाशी हा किल्लाचे खुपच संबध आहेत. पंडीत जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वंतत्र झाल्याची घोषणा केली होती. लाल किल्ल्याची बांधणी मुघल सम्राट शाहजान यांनी केली.मुघल सम्राट शाहजहानने हा किल्ला १६३८ इस ला बांधून घेण्यास सुरु केले व तो १६४८ इस मध्ये पूर्ण झाला.