Jump to content

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय

बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांना सुलभ जीवन जगता यावे या कारणासाठी परिणामकारक नागरी कार्यक्रम समर्पित करण्याची मुंबई महानगरपलिकेची ऐतिहासिक परंपरा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बृ.मुं.म.न.पा.) ही अशी प्राथमिक संस्था आहे जी बृहन्मुंबईतील नागरी सेवांकरिंता जबाबदार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना १८८२ मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली. तिच्या स्थापनेपासून, बहुसंख्य अराजकीय गट, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक संघटना तिच्या बरोबर शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नागरी सोयीसुविधा, कला आणि संस्कृती, पुरातन वास्तू जतन, इ. क्षेत्रामध्ये फार लक्षपूर्वक काम करित आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संस्था ह्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कुटुंबाचा एक घटक असून मुंबईच्या नागरिकांकरिता कार्यक्षम आणि उत्कृष्ट सेवा देण्याचे ध्येय गाठण्यासाठी एकत्रित काम करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.