हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)
Appearance
हार्बर मार्ग हा मुंबई उपनगरी रेल्वेच्या मार्गांपैकी एक आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या पूर्व भागातून धावतो. नवी मुंबई शहर हार्बर मार्गाद्वारे मुंबईसोबत जोडले गेले आहे. हार्बर मार्गावरील सर्व लोकल धीम्या गतीच्या असून छशिमट ते पनवेल व गोरेगावपर्यंत सेवा पुरवली जाते.