ताजमहाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


ताज महाल
Taj Mahal Exterior.jpg
स्थान आग्रा, उत्तर प्रदेश, भारत
उंची ७३ मी (२४० फूट)
निर्मिती १६३२–५३[१]
वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहुरी
वास्तुशैली मुघल स्थापत्य
दर्शन 7–8 million[२] (in 2014)
प्रकार सांस्कृतिक
कारण (i)
सूचीकरण 1983 (7th session)
नोंदणी क्रमांक 252
देश भारत
खंड आशिया

ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुनानदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुगल बादशाहशहाजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले. ताज महालाचे बांधकाम इ.स. १६५३ मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २०,००० कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले. ताज महाल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उदाहरण आहे. युनेस्कोने ताज महाल या वास्तूला इ.स. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेले. प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष (३०,००,०००) पर्यटक ताज महालाला भेट देतात !

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ Lesley A, Dutemple (2003). ताजमहाल. Lerner Publications Co. पान क्रमांक 32. आय.एस.बी.एन. 0-8225-4694-9. 7 February 2015 रोजी पाहिले. 
  2. ^ "Archaeological Survey of India Agra working on compiling visual archives on Taj Mahal". The Economic Times. 29 November 2015. 16 January 2016 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे