भीमबेटका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
भीमबेटका येथील खडकांवरील चित्रे

भीमबेटका ही एक पुरातन जागा व जागतिक वारसा स्थान असून, हे ठिकाण भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या रायसेन जिल्ह्यात आहे. भारताच्या आदिम संस्कृतीचे अवशेष येथे बघावयास मिळतात. सुमारे एक लाख वर्षांपूर्वीची मानवाच्या राहण्याची ही जागा असावी असे अनेकांचा तर्क आहे.[१][२] यांपैकी तेथील पाषाणयुगीन गुहेतील चित्रकारी सुमारे ३०,००० वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते.[३]

याचे नाव हे अतिबलवानभीम या महाभारतातील पात्राबरोबर जोडले जाते.[४] हे नाव भीमाची बैठक -भीमबैठक-भिमबेटका असे अपभ्रंश होऊन बनलेले असावे असे काही मानतात. मध्य प्रदेशामध्ये ह्या ठिकाणाला भीमबैठक याच नावाने ओळखतात.[४]

चित्र दीर्घा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. Javid, Ali and Javeed, Tabassum. World Heritage Monuments and Related Edifices in India. 2008, page 19
  2. http://originsnet.org/bimb1gallery/index.htm
  3. Wendy Doniger, The Hindus (Penguin Press 2009): p.66
  4. ४.० ४.१ Mathpal, Yashodhar. Prehistoric Painting Of Bhimbetka. 1984, page 25

बाह्य दुवे[संपादन]