Jump to content

हुसेनसागर एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१२७०२ हुसेनसागर एक्सप्रेस - कोच स१

हुसेनसागर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते हैदराबाद दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. ही गाडी दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येते.

इतिहास

[संपादन]

ही गाडी इ.स. १९९३मध्ये हैदराबाद-दादर दरम्यान आठवड्यातून दोन दिवस चालू झाली. एक वर्षाच्या आत हिच्या फेऱ्या वाढून ही रोज धावू लागली. पूर्वीची रेल्वे क्र २१०१/२१०२ छत्रपती शिवाजी टर्मिनससिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या मिनार एक्स्प्रेसची जागा हुसेनसागर एक्स्प्रेसने घेतली. []

रेल्वेचे नाव

[संपादन]

इब्राहीम कुली कुतुबशाह हैद्राबादचा राज्यकर्ता होता तेव्हा हजारत हुसेन शाह वाली यांनी सन 1562 मध्ये हुसेंनसागर झील निर्माण केले होते. आजही हे झील म्हणजे हैद्राबादची शान आहे. पर्यटकांसाठी हे एक आकर्षक स्थळं आहे. या सर्व इतिहासाचा व चालू स्थितीचा विचार करून या रेल्वेचे नाव त्या स्थळाला साजेशे हुसेंनसागर एक्सप्रेस ठेवलेले आहे.

रेल्वेची वेळ

[संपादन]

हुसेंनसागर एक्स्प्रेसची वेळ खालील प्रमाणे आहे.[]

गन्तव्य स्थान वेळ आगमन स्थान वेळ (दुसरा दिवस)
मुंबई रात्री 21.50 हैद्राबाद दुपारी 12.10
हैद्राबाद दुपारी 2.45 मुंबई सकाळी 4.55

हुसेंनसागर एक्स्प्रेस रेल्वेचे मुंबई – हैद्राबाद हे प्रवासाचे अंतर 790 किमी (410 मैल) आहे. हुसेंनसागर एक्स्प्रेस या रेल्वेची सरासरी तासी वेग 58.7 किमीआहे.

रचना

[संपादन]
क्रमांक वर्ग रचना
जनरल स्लीपर वर्ग 10 बोगी
त्रितीय वर्ग स्लीपर वातानुकूलित 2 बोगी
द्वितीय वर्ग स्लीपर वातानुकूलित 1 बोगी
प्रथम वर्ग + 2 मिश्रित वातानुकूलित 1 बोगी
जनरल वर्ग 4 बोगी

इतर सेवा

[संपादन]
  1. टीकीट व्यवस्था IRCTC मार्फत आहे.
  2. मुंबई हैद्राबाद दरम्यानच्या 17 स्थानकावर ही रेल्वे थांबते. सोलापूर येथे ही रेल्वे 10 मिनिटे थांबते.
  3. हैद्राबाद बिर्याणी प्रसिद्ध आहे ते विचारात घेऊन या रेल्वे मध्ये माफक दराने चविस्ट खान पान व्यवस्था केलेली आहे. या चवीचे स्मरण करून नियमित प्रवाशी नेहमीच या रेल्वेचा प्रवास पसंत करतात. सुखद प्रवास काय असतो हे अनुभवायचे असेल तर हुसेंनसागर एक्स्प्रेस रेल्वे ने प्रवास करून ते अनुभवावे म्हणजे कळेल.
  4. नियमानुसार होल्डालची व्यवस्था आहे.
  5. या रेल्वेला मिलिटरी बोगीची व्यवस्था आहे.

प्रवास भाडे

[संपादन]
क्रमांक वर्ग प्रवास

भाडे

स्लीपर क्लास 425/- ($7)
त्रितीय वर्ग 1125/- ($18)
द्वितीय वर्ग 1590/- ($26)
प्रथम वर्ग 2695/- ($44)

सारांश

[संपादन]

हैद्राबाद आणि मुंबई ही दोन्ही शहरे व्यापारी केंद्रे आहेत. दोन्ही शहरात इकडून तिकडे प्रवास करणारा व्यापारी तसेच नोकर वर्ग फार मोठा आहे. हुसेंनसागर एक्सप्रेस रेल्वेची वेळ काटेकोरपणे पाळण्यात अतिशय चोखंदळ आहे. त्यामुळे प्रवाशांना ही रेल्वे खूप आवडते आणि प्रवाश्याकडून ह्या रेल्वेची मागणी वाढतच आहे. ह्या रेल्वेचे रिझर्वेशन फार मुश्किलीने मिळते. सोलापूर विभागातील प्रवाशीही ह्या रेल्वेची मागणी वरील कारणानेच करतात.

रेल्वेच्या बाबतीत एक ब्रीद वाक्य प्रसिद्ध आहे. “ भारतीय रेल्वे ही सर्व भारतीयांची जीवन दाहिणी आहे.” हुसेंनसागर रेल्वेला एचई ब्रीद वाक्य अतिशय एलएएजीयू पडत.

मार्ग

[संपादन]

हुसेनसागर एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची स्थानके मुंबई, कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वाडीहैदराबाद ही आहेत.

रेल्वे क्रमांक[]

[संपादन]
  • २७०१: मुंबई छ.शि.ट. - २१:५० वा, हैद्राबाद - १२:१० वा (दुसरा दिवस)
  • २७०२: हैद्राबाद - १४:४५ वा, मुंबई छ.शि.ट. - ५:०५ वा (दुसरा दिवस)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "हुसेनसागर एक्सप्रेस (२७०१)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "हुसेनसागर एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत). 2015-03-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-05-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ भारतीय रेल्वेचे संकेतस्थळ