पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१६-१७
Jump to navigation
Jump to search
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा २०१६-१७ | |||||
न्यू झीलँड | पाकिस्तान | ||||
तारीख | ११ – २९ नोव्हेंबर २०१६ | ||||
संघनायक | केन विल्यमसन | मिस्बाह-उल-हक (१ली कसोटी) अझहर अली (२री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रॉस टेलर (१५०) | बाबर आझम (१४२) | |||
सर्वाधिक बळी | टिम साउथी (१३) | मोहम्मद आमीर (७) सोहेल खान (७) |
दोन कसोटी आणि एक तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याच्या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये न्यूझीलंड दौरा केला.[१][२] दोन कसोटी सामन्यांसाठी ख्राईस्टचर्च आणि हॅमिल्टन या दोन स्थळांची निवड करण्यात आली होती.[३][४]
१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपानंतरसुद्धा १७ नोव्हेंबरची कसोटी ठरलेल्या वेळेनुसार पार पडली.[५] परंतू पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचाच खेळ होऊ शकला.
दुसर्या कसोटीसहित मालिका २-० अशी जिंकून, १९८५ नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडने पाकिस्तानवर मालिका विजय मिळवला.[६][७]
संघ[संपादन]
![]() |
![]() |
---|---|
- मिस्बाह-उल-हकच्या सासर्यांचे देहावसन झाल्याने त्याला दौरा अर्धवट सोडून जावे लागले आणि त्याच्या ऐवजी दुसर्या कसोटीसाठी अझहर अलीची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली.[१०]
- त्यानंतर पहिल्या कसोटीमध्ये षटकांची गती कमी राखल्याने मिस्बाह-उल-हकवर एका सामन्याची बंदी लादण्यात आली आणि यामुळे तो दुसर्या कसोटीत खेळू शकला नसता.[११]
- दुसर्या कसोटीमध्ये न्यूझीलंड संघात जेम्स नीशॅम ऐवजी मिचेल सॅंटनरची निवड करण्यात आली.[१२]
- गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे ट्रेंट बोल्ट ऐवजी डग ब्रेसवेलला दुसर्या कसोटीसाठी न्यूझीलंड संघात स्थान मिळाले.[१३]
सराव सामना[संपादन]
प्रथम श्रेणी: न्यूझीलंड अ वि पाकिस्तानी[संपादन]
वि
|
||
- नाणेफेक: न्यूझीलंड अ, फलंदाजी
- तीनही दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
कसोटी मालिका[संपादन]
१ली कसोटी[संपादन]
वि
|
||
- नाणेफेक: न्यूझीलंड, गोलंदाजी
- पावसामुळे १ल्या दिवसाचा खेळ रद्द.
- कसोटी पदार्पण: जीत रावल आणि कॉलिन दी ग्रॅंडहोम (न्यू).
- कर्णधार म्हणून ५० कसोटी खेळणारा मिसबाह उल हक हा पहिलाच पाकिस्तानी क्रिकेटपटू.
- कॉलिन दी ग्रॅंडहोम हा पदार्पणात पाच बळी मिळवणारा न्यूझीलंडचा आठवा गोलंदाज आणि पहिल्या डावातील त्याची गोलंदाजी कामगिरी ही १९५१ मधील इंग्लंडविरुद्ध ॲलेक्स मॉयरच्या कामगिरीला मागे टाकून न्यूझीलंडतर्फे पदार्पणातील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१४]
- नील वॅग्नरचे (न्यू) १०० कसोटी बळी पूर्ण. सर्वात जलद १०० कसोटी बळी पूर्ण करणारा तो न्यूझीलंडचा दुसर्या क्रमांकाचा गोलंदाज.[१५]
२री कसोटी[संपादन]
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, गोलंदाजी.
- १ल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचा खेळ होऊ शकला.
- ३र्या दिवशी पावसामुळे फक्त ३८.१ षटकांचा खेळ होऊ शकला.
- कसोटी पदार्पण: मोहम्मद रिझवान (पा)
- अझहर अलीचा (पा) कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना.[१०]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "क्रिकेट वेळापत्रक २०१६: नवीन वर्षातील सर्व प्रमुख मालिकांचे सामने आणि तारखा". इंटरनॅशनल बिझनेस टाइम्स (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट: प्लीज सेव्ह अस फ्रॉम ग्राउंडहॉग डे". न्यूझीलंड हेराल्ड (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड विरुद्ध २०१८ मध्ये दिवस-रात्र कसोटीच्या यजमान पदासाठी इडन पार्क सज्ज". स्टफ.को.एनझेड. २७ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडविरुद्ध २०१८ मध्ये इडन पार्कवर दिवस-रात्र कसोटीचे न्यूझीलंडचे लक्ष्य". इएसपीएन क्रिकइन्फो. २७ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ख्राईस्टचर्च कसोटी ठरवलेल्या वेळेनुसार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "शेवटच्या नाट्यमय सत्रात न्यूझीलंडने विजयश्री खेचून आणली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानला बाद करुन न्यूझीलंडचा थरारक २-० विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान कसोटीसाठी गुप्टिलला वगळले; रावल, टॉड ॲस्टलची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "न्यूझीलंड दौर्यासाठी शर्जील खानची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ↑ a b "मिसबाह हॅमिल्टन कसोटीला मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "षटकांची गती कमी राखल्याने मिस्बाह-उल-हकवर एका सामन्याची बंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "सॅंटनर ऐवजी नीशॅम". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दुसर्या कसोटी मधून बोल्ट बाहेर, ब्रेसवेलची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दी ग्रॅंडहोमच्या सहा बळींनी पाकिस्तान उध्वस्त". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वॅग्नर रेसेस टू १०० विकेट्स, अझहर क्रॉल्स टू ३१". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.