इंग्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१६-१७
इंग्लंड क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१६-१७ | |||||
बांगलादेश | इंग्लंड | ||||
तारीख | ३ ऑक्टोबर – १ नोव्हेंबर २०१६ | ||||
संघनायक | मुशफिकुर रहिम (कसोटी) मशरफे मोर्तझा (ए.दि.) |
अलास्टेर कुक (कसोटी) जोस बटलर (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | तमिम इक्बाल (२३१) | बेन स्टोक्स (१२८) | |||
सर्वाधिक बळी | मेहेदी हसन (१९) | बेन स्टोक्स (११) मोईन अली (११) | |||
मालिकावीर | मेहेदी हसन (बां) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इमरुल केस (१६९) | मशरफे मोर्तझा (८) | |||
सर्वाधिक बळी | बेन स्टोक्स (१४८) | आदिल रशीद (१०) | |||
मालिकावीर | बेन स्टोक्स (इं) |
इंग्लंड क्रिकेट संघ ऑक्टोबर २०१६ मध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर तीन एकदिवसीय, दोन कसोटी आणि तीन सराव सामने खेळण्यासाठी आला होता.[१][२][३]
दौरा सुरू होण्याच्या अवघ्या चार महिन्यांआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संघामधील खेळाडूंकडून सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली गेली, त्याचे पर्यावसन दोन खेळाडूंनी दौऱ्यामधून अंग काढून घेण्यात (ज्यामध्ये मर्यादित षटकांचा कर्णधार आयॉन मॉर्गन आणि सलामीवीर ॲलेक्स हेल्सचा समावेश होता) झाले.
इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. पहिल्या कसोटीमध्ये २२ धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागलेल्या बांगलादेश संघाने दुसरी कसोटी १०८ धावांनी जिंकली आणि त्यांचा इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी विजय नोंदवून कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.[४] बांगलादेशचा कर्णधार, मुशफिकुर रहिम म्हणाला, "बांगलादेश क्रिकेटसाठी हा एक खूपच मोठा क्षण आहे".[५] पराभवाच्या उत्तरादाखल इंग्लंडचा कर्णधार अलास्टेर कुक म्हणाला "मला हे बोलणं सोपं नाहीये, पण बांगलादेश क्रिकेट साठी हा एक चांगला विजय आहे".[५]
सुरक्षाविषयक साशंकता
[संपादन]जुलै २०१६ रोजी ढाक्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी) ने सांगितले की आगामी दौऱ्यासाठी ते बांगलादेश सरकारचा सल्ल्यानुसार निर्णय घेतील.[६][७] उत्तरादाखल बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी)चे अध्यक्ष नाझमुल हसन म्हणाले की, "इंग्लंडचा संघ तीन महिन्यांनंतर येणार आहे, तोपर्यंत बांगलादेशच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल".[८] इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार आयॉन मॉर्गन म्हणाला की हल्ल्यांमुळे इंग्लंडच्या संघाच्या सुरक्षेबाबत "मोठे चिंता" आहे.[९][१०] त्यानंतर इंग्लंडने बांगलादेश दौरा रद्द केल्यास, तटस्थ ठिकाणी सामने खेळण्याविषयीची शक्यता बीसीबीने फेटाळून लावली.[११] बांग्लादेशचा कर्णधार मशरफे मोर्तझा म्हणाला की दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होण्याबाबत तो "आशावादी" आहे.[१२] बांगलादेशचे क्षेत्ररक्षणाचे झिंम्बाब्वियन प्रशिक्षक रिचर्ड हाल्साल म्हणाले की, त्यांना बांगलादेशमध्ये काम करण्यास सुरक्षित वाटते आणि इंग्लंडच्या आगमनाबाबत त्यांना आशा आहे.[१३]
ऑगस्ट महिन्यात इसीबीने मीरपूर, चट्टग्राम आणि फतुल्ला येथे सुरक्षा निरिक्षणासाठी एक पथक पाठवले.[१४] निरक्षणानंतर, इसीबीने दौरा नियोजन केल्यानुसार पार पडेल असे जाहीर केले.[१५][१६] दौरा नियोजित वेळेनुसार होणार याची पुष्टी मिळाल्यानंतर इंग्लंडचे क्रिकेट संचालक, अँड्रु स्ट्रॉस, म्हणाले बांगलादेशचा दौरा करणे १००% सुरक्षित आहे.[१७] बीसीबी अध्यक्ष, नाझमुल हसन, म्हणाले की बीसीबी खेळाडूंच्या कुटूंबातील सदस्य, पत्रकार आणि इंग्लंडचे चाहते या सर्वांना सुरक्षा पुरवेल.[१८]
काही खेळाडूंनी त्यांचा सहभाग पक्का करण्याआधी सुरक्षा मापदंडाबाबत मतप्रदर्शन केले[१९][२०][२१] परंतु मोईन अली हा इंग्लंडचा पहिला खेळाडू होता ज्याने स्वतःचा सहभाग निश्चित केला, तो म्हणाला "जर निवड झाली, तर मी नक्की जाईन".[२२] अँड्रु स्ट्रॉसने खेळाडूंना त्यांचा सहभाग निश्चित करण्याबाबत १० सप्टेंबर २०१६ची मुदत दिली [२३] आणि ११ सप्टेंबर रोजी इसीबीने घोषित केले की ॲलेक्स हेल्स आणि मॉर्गन दोघांनी दौऱ्यासाठी नकार दिला आहे.[२४] बांगलादेशचे पाठिराखे बार्मी आर्मीने मत मांडले की चाहत्यांनी बांगलादेशला जाण्यात "खूप जास्त धोका" आहे.[२५][२६]
मॉर्गनच्या गैरहजेरीत एकदिवसीय मालिकेसाठी जोस बटलरची कर्णधारपदी निवड करण्यात आली.[२७][२८] बटलर म्हणाला की मॉर्गन हाच आमचा "सर्वस्वी कर्णधार" राहिल आणि त्याच्या बांगलादेश दौऱ्याचर न येण्याच्या निर्णयामुळे "ड्रेसिंग रुम मध्ये फुट पडणार नाही".[२९] नोव्हेंबर महिन्यातील भारताच्या दौऱ्यावर मॉर्गन त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदावर रुजू होईल असी अपेक्षा आहे.[३०] एकदिवसीय मालिकेआधी बांगलादेश आर्मीने खेळाडूंना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एक सुरक्षा प्रात्यक्षिक करून पाहिले.[३१][३२]
संघ
[संपादन]कसोटी | एकदिवसीय | ||
---|---|---|---|
बांगलादेश[३३] | इंग्लंड[३४] | बांगलादेश[३५] | इंग्लंड[३४] |
- जेम्स अँडरसन आणि मार्क वूड यांनी दौरा सुरू होण्याआधी दुखापतीमुळे संघातून अंग काढून घेतले.[३६] त्यांच्या ऐवजी जॅक बॉलचा कसोटी संघात तर स्टीव्हन फिनचा एकदिवसीय संघात समावेश केला गेला.
- तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी मोशर्रफ होसेन ऐवजी तैजूल इस्लामची निवड करण्यात आली.[३७]
सराव सामने
[संपादन]एकदिवसीयः बांगलादेश क्रिकेट बोर्ड निवडक XI वि इंग्लंड XI
[संपादन]बांगलादेश क्रिकेट बोर्ड निवडक XI
३०९/९ (५० षटके) |
वि
|
|
- नाणेफेक : बांगलादेश क्रिकेट बोर्ड निवडक एकादश, फलंदाजी
- प्रत्येकी १४ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
दोन दिवसीयः बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI वि इंग्लंड XI
[संपादन]वि
|
बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI
| |
- नाणेफेक: इंग्लंड XI, फलंदाजी
- १ल्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही
- प्रत्येकी १२ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
दोन दिवसीयः बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI वि. इंग्लंड XI
[संपादन]बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI
|
वि
|
|
- नाणेफेक: बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI, फलंदाजी
- प्रत्येकी १४ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
- तमिम इक्बाल हा ५,००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिलाच बांगलादेशी फलंदाज.[३९]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: बेन डकेट (न्यू), कामरुल इस्लाम रब्बी, मेहेदी हसन, शब्बीर रहमान (बां)
- इंग्लंड तर्फे सर्वाधिक (१३४) कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व करणारा क्रिकेट खेळाडू ठरला.[४०]
- पदार्पणातील कसोटीमध्ये पाच गडी बाद करणारा मेहेदी हसन हा सातवा आणि बांगलादेशचा सर्वात लहान गोलंदाज.[४१]
- गारेथ बॅटी (इं) हा दोन कसोटी सामन्यांदरम्यान सर्वात जास्त कसोटी सामन्यांना मुकलेला खेळाडू ठरला (१४२).[४१]
- जॉनी बेरस्टो (इं) हा एका कॅलेंडर वर्षातील पहिल्या डावात १,००० कसोटी धावा करणारा दुसरा फलंदाज, त्याशिवाय ६ किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना एका कॅलेंडर वर्षात १,००० कसोटी धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज.[४१] त्यानंतर तो एका कॅलेंडर वर्षातील दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक ठरला.[४२]
- शकिब अल हसन हा १५० कसोटी बळी घेणारा बांगलादेशचा पहिलाच गोलंदाज.[४३]
- इंग्लंडचा बांगलादेशविरुद्ध सर्वात निसटता विजय तसेच धावांच्या दृष्टीनेसुद्धा आशियातील सर्वात लहान विजय.[४४]
- कसोटी क्रिकेट मधील बांगलादेशचा सर्वात लहान पराभव.[४५]
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी
- १ल्या दिवशी पावसामुळे केवळ ७७ षटकांचा खेळ होऊ शकला.
- कसोटी पदार्पण: झाफर अन्सारी (इं)
- मुशफिकुर रहिमचा (बां) ५० वा कसोटी सामना[४६]
- अलास्टेर कुकची इंग्लंडतर्फे कर्णधार म्हणून सर्वात जास्त कसोटी क्रिकेट खेळण्याच्या विक्रमाशी बरोबरी (५४).[४६]
- कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून १०,००० धावा पूर्ण करणारा अलास्टेर कुक (इं) हा पहिलाच फलंदाज.[४६]
- ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद ची ९९ धावांची भागीदारी ही आशियामध्ये कसोटी क्रिकेट मधील ९व्या गड्यासाठीची सर्वोत्कृष्ट भागीदारी.[४७]
- मेहेदी हसनने कसोटी मालिकेमध्ये १९ गडी बाद केले, कोणत्याही बांगलादेशी गोलंदाजाची ही मालिकेतील सर्वोत्तम कामगिरी.[४८]
- मेहेदी हसनची १५९ धावांत १२ बळी ही बांगलादेशी गोलंदाजातर्फे कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी.[४८]
- बांगलादेशचा इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी विजय.[४८]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "इंग्लंडचा २०१६ बांग्लादेश दौर्याचे थेट प्रक्षेपण स्काय स्पोर्ट्स वर होणार". द गार्डियन (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडच्या २०१६ मधील बांगलादेश दौर्याच्या प्रक्षेपणाचे हक्क स्काय स्पोर्ट्सकडे". स्काय स्पोर्ट्स (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ऑक्टोबर मध्ये बांगलादेशच्या दौर्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामन्यांसाठी सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड वि बांगलादेश: १०८ धावांच्या पराभवामध्ये पर्यटक कोसळले". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "'बांगलादेश क्रिकेटसाठी हा एक खूपच मोठा क्षण आहे' – मुशफिकुर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश दौर्यासाठी इसीबी बांगलादेश सरकारचा सल्ला घेणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ढाका कॅफे हल्ल्यानंतर इसीबी बांगलादेश सुरक्षेचे निरिक्षण करणार". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ३ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडचा दौरा वेळापत्रकानुसार होण्याबाबत बीसीबी आशावादी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मॉर्गनला बांगलादेश दौर्याविषयी 'मोठी चिंता'". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश वि इंग्लंड: ऑक्टोबर दौर्याच्या सुरक्षेबाबद आयॉन मॉर्गनला चिंता". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ६ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड विरुद्ध तटस्थ ठीकाणी खेळण्यास बीसीबीचा नकार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडच्या बांगलादेश दौर्याबाबद मशरफे 'आशावादी'". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश क्षेत्ररक्षण प्रशिक्षक इंग्लंडच्या दौर्याबाबत आशावादी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इसीबी पथकाद्वारे बांगलादेशची सुरक्षा तपासणी पूर्ण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ डॉबेल, जॉर्ज. "बांगलादेश दौर्यासाठी इंग्लंडकडून हिरवा कंदिल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "सुरक्षेबाबत चिंतांनंतरही इंग्लंडचा बांगलादेश दौरा होणार". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश दौर्यावर जास्तीत जास्त सहभागाबाबत स्ट्रॉस आशावादी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडच्या चाहत्यांना बीसीबीकडून मदतीचे आश्वासन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश दौर्यासंदर्भात प्लंकेटच्या मनात प्रश्नचिन्ह". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "नवीन मैदान ही बांगलादेशची समस्या". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मी बांगलादेशचा दौरा करण्यास नाखुष आहे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मोईन अली बांगलादेशला 'नक्की जाणार'". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश दौरा निश्चितीसाठी स्ट्रॉसचा मॉर्गनवर दबाव". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मॉर्गन आणि हेल्स बांगलादेश दौर्याला मुकणार". इसीबी (इंग्रजी भाषेत). ११ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बार्मी आर्मी: इंग्लंडच्या चाहत्यांच्या गटाची बांगलादेश प्रवासाविरुद्ध चेतावणी". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). ८ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बार्मी आर्मी बांगलादेशमध्ये जाणार नाही". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांग्लादेश वि इंग्लंड: आयॉन मॉर्गन आणि हेल्स सुरक्षाविषयक कारणांमुळे दौर्यावर जाणार नाहीत". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १२ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मॉर्गन, हेल्सची बांगलादेश दौर्यातून माघार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मॉर्गनच्या निर्णयामुळे आमच्यात फुट पडणार नाही – बटलर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मॉर्गनकडू भारताविरुद्ध नेतृत्वाची अपेक्षा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड्स विजीट मछ मोर दॅन जस्ट अनदर सिरीज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश वि इंग्लंड: एकदिवसीय मालिकेसाठी चोख सुरक्षाव्यवस्था". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश कसोटी संघात शब्बीरची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "बांगलादेश कसोटी मालिकेसाठी तीन नवोदितांना संधी". इसीबी (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी अल-अमिनची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ॲंडरसन बांगलादेश मालिकेला मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "तिसर्या एकदिवसीय सामन्यासाठी तैजूल इस्लामचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "बॉलच्या पराक्रमामुळे इंग्लंडचा अशक्यप्राय विजय साकार". इएसपीएन क्रिकइन्फो. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बांगलादेश वि इंग्लंड: पहुण्यांनी एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "रेकॉर्ड-ब्रेकिग कुक ॲडमिट्स टफ टू लीव्ह फॅमिली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c "मेहेदी कंटिन्यूज अ डेब्यु ट्रेंड, बेरस्टो'ज रेकॉर्ड इयर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बेरस्टोचे विक्रम आणि इंग्लंड पहिल्या ३ संघात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "किकेट नोंदी – नोंदी – बांगलादेश – कसोटी सामने – सर्वाधिक बळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट नोंदी – नोंदी – इंग्लंड – कसोटी सामने – सर्वात लहान विजय (बरोबरी धरुन)". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी – स्टॅट्सगुरू – कसोटी सामने – सांघिक विक्रम". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c "बांगलादेश वि इंग्लंड, २री कसोटी, दिवस १ला - आकडेवारी: अलास्टेर कुकने इतिहास केला,स्पोर्ट्सकीडा" (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मेहदीज फाईव्ह, ॲंड द पेस-स्पिन कॉन्ट्रास्ट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c "इंग्लडचा डाव कोसळला, मेहदीचे विक्रमी मालिका पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.