श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७
श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७ | |||||
झिम्बाब्वे | श्रीलंका | ||||
तारीख | २९ ऑक्टोबर – १० नोव्हेंबर २०१६ | ||||
संघनायक | ग्रेम क्रिमर | रंगना हेराथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रेम क्रिमर (१५३) | दिमथ करुणारत्ने (२८०) | |||
सर्वाधिक बळी | ग्रेम क्रिमर (११) | रंगना हेराथ (१९) | |||
मालिकावीर | दिमथ करुणारत्ने (श्री) |
श्रीलंका क्रिकेट संघाने ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान झिम्बाब्वे दौरा केला. सुरुवातीला जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार दौऱ्यावर दोन कसोटी, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एक टी२० सामना खेळवला जाणार होता.[१] ऑगस्ट २०१६, मध्ये जाहीर केले गेले की ह्या दौऱ्याऐवजी झिम्बाब्वे, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज दरम्यान त्रिकोणी मालिका खेळवली जावू शकते.[२] सप्टेंबर २०१६ मध्ये जाहीर केले गेले की मर्यादित षटकांच्या सामन्यांऐवजी त्रिकोणी मालिका खेळविली जाईल आणि श्रीलंकेचा संघ झिम्बाब्वेमध्ये फक्त दोन कसोटी सामने खेळेल.[३]
उभय संघांदरम्यान याआधी २००४ मध्ये कसोटी सामना झाला होता.[४] मालिकेतील पहिली कसोटी ही झिम्बाब्वेची १०० वी कसोटी आहे.[४] मालिकेतील दुसऱ्या सामन्यात डीआरएस पद्धत वापरली गेली.[५] झिम्बाब्वेमध्ये हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरले गेले, याआधी जास्त किंमतीमुळे ही पद्धत वापरात नव्हती.[५]
संघ
[संपादन]झिम्बाब्वे[६] | श्रीलंका[७] |
---|---|
दुखापतीमुळे अँजेलो मॅथ्यूज ऐवजी रंगना हेराथ कडे श्रीलंकेचे कर्णधारपद सोपवण्यात आले.[८]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२९ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाज
- पावसामुळे ४थ्या दिवशी चहापानानंतर थोड्याचवेळाने खेळ थांबवण्यात आला आणि पुन्हा सुरू होऊ शकला नाही.
- कसोटी पदार्पण: असेला गुणरत्ने, लाहिरु कुमार (श्री) आणि कार्ल मुंबा (झि).
- झिम्बाब्वेचा १००वा कसोटी सामना.[४]
- रंगना हेराथचा (श्री) कर्णधार म्हणून पहिला कसोटी सामना.[४]
- कुशल परेराचे (श्री) पहिले कसोटी शतक.[९]
- ग्रेम क्रिमरचे (झि) पहिले कसोटी शतक.[१०]
२री कसोटी
[संपादन]६ - १० नोव्हेंबर २०१६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: झिम्बाब्वे, गोलंदाजी
- झिम्बाब्वे मध्ये पहिल्यांदाच डीआरएसचा वापर केला गेला.[५]
- असेला गुणरत्नेचे (श्री) पहिले कसोटी शतक.[११]
- कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध एका डावात ५ बळी घेणारा रंगना हेराथ (श्री) हा तिसरा गोलंदाज.[१२]
- कार्ल मुंबाला बाद करून रंगना हेराथचे ३५० कसोटी बळी पूर्ण.
त्रिकोणी मालिका
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "भविष्यातील दौर्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). २५ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे-श्रीलंका कसोटी सामन्यांऐवजी त्रिकोणी मालिका होण्याची शक्यता". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "त्रिकोणीमालिकेसा श्रीलंका, वेस्टइंडीजचे यजमानपद झिम्बाब्वेकडे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c d "झिम्बाब्वेच्या १०० व्या कसोटीमध्ये हेराथचे श्रीलंकेच्या कर्णधारपदी पदार्पण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b c "झिम्बाब्वे क्रिकेट डीआरएस वापरण्यास सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंका कसोटीसाठी चटारा, पन्यागारा अनफिट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकेचा तेजगती तरुण गोलंदाज लाहिरु कुमार कसोटी संघात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मॅथ्यूजला दुखापत, हेराथ कर्णधारपदासाठी सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "परेराच्या जलद ११० धावांमुळे श्रीलंकेचा वरचष्मा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "क्रिमरच्या नाबाद १०२ धावांमुळे झिम्बाब्वेचा फॉलो-ऑन टळला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "गुरुरत्नेच्या शतकाने श्रीलंकेच्या पहिल्या डावात ५०४ धावा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "रंगना हेराथचा पाच गड्यांचा संच पूर्ण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १० नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.