श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७
श्रीलंका क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७ | |||||
दक्षिण आफ्रिका | श्रीलंका | ||||
तारीख | १८ डिसेंबर २०१६ – १० फेब्रुवारी २०१७ | ||||
संघनायक | फाफ डू प्लेसी (कसोटी) फरहान बेहार्डीन (टी२०) ए.बी. डी व्हिलियर्स (ए.दि.) |
अँजेलो मॅथ्यूज (कसोटी, १ला व २रा टी२०) दिनेश चंदिमल(३रा टी२०) उपुल तरंगा (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डीन एल्गार (३०८) | अँजेलो मॅथ्यूज (१७८) | |||
सर्वाधिक बळी | कागिसो रबाडा (१९) | सुरंगा लकमल (१२) | |||
मालिकावीर | डीन एल्गार (द) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | फाफ डू प्लेसी (४१०) | निरोशन डिक्वेल्ला (१९७) | |||
सर्वाधिक बळी | वेन पार्नेल (११) | सुरंगा लकमल (५) | |||
मालिकावीर | फाफ डू प्लेसी (द) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | फरहान बेहार्डीन (६४) | निरोशन डिक्वेल्ला (१३३) | |||
सर्वाधिक बळी | लुंगी न्गिदी (६) इम्रान ताहिर (६) |
लक्षण संदकन (५) नुवान कुलशेखर (५) | |||
मालिकावीर | निरोशन डिक्वेल्ला (श्री) |
श्रीलंका क्रिकेट संघाने डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दौऱ्यावर तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळवले गेले.[१] सुरुवातीला वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची स्थानिक टी२० स्पर्धा - रॅम स्लॅम टी२० - साठी तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला.[२]
१२ डिसेंबर २०१६ रोजी ए.बी. डी व्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेचे कसोटी कर्णधारपद सोडले. त्याने त्याच्या ऐवजी फाफ डू प्लेसीचे नाव सुचवले, आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) त्यास मान्यता दिली.[३] मालिकेच्या आधी, डू प्लेसीला नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान चेंडू फेरफार प्रकरणी दोषी करार दिले गेले. त्याने त्याबाबत अपील केले, पण ते नाकारण्यात आले. त्याचे दुसऱ्या कसोटीचे मानधन कापून घेण्यात आले, परंतु एका-सामन्याच्या बंदीच्या कठोर शिक्षेपासून तो बचावला.[४] डी व्हिलियर्स संघात परतला आणि त्याला एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले.[५] तो तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात सुद्धा खेळला, ज्यात नेतृत्व फरहान बेहार्डीनने केले होते.[६]
दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-० ने जिंकली.[७] टी२० मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकून दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील आपला पहिला मालिका विजय साकारला.[८] दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय मालिकेमध्ये ५-० असे निर्भेळ यश संपादन करून आयसीसी एकदिवसीय चँपियनशीपमध्ये पहिले स्थान मिळवले.[९]
संघ
[संपादन]कसोटी | एकदिवसीय | टी२० | |||
---|---|---|---|---|---|
दक्षिण आफ्रिका[१०] | श्रीलंका[११] | दक्षिण आफ्रिका[५] | श्रीलंका[१२] | दक्षिण आफ्रिका[१३] | श्रीलंका[१४] |
- दुसऱ्या कसोटीनंतर काइल ॲबटऐवजी डुआन ऑलिव्हरची दक्षिण आफ्रिकेच्या संघात निवड करण्यात आली. केल ॲबटने कोल्पाक खेळाडू म्हणून हँपशायर ह्या इंग्लिश संघातर्फे खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून राजीनामा दिला.[१५][१६]
- पहिल्या टी२० सामन्यादरम्यान नुवान प्रदीपच्या हाताला फ्रॅक्चर झाल्यामुळे उर्वरीत दौऱ्यासाठी त्याला वगळण्यात आले.[१७]
- दुसऱ्या टी२० नंतर अँजेलो मॅथ्यूज, नुवान प्रदीप आणि दनुष्का गुणतिलक संघ सोडून मायदेशी परतले. प्रदीप आणि गुणतिलला दुखापत झाली, तर वैयक्तिक कारणांमुळे मॅथ्यूजने दौरा अर्धवट सोडावा लागला. मॅथ्यूजच्या गैरहजेरीत कर्णधारपद दिनेश चंदिमलकडे गेले.[१८]
- पोटाच्या दुखण्याने लुंगी न्गिदीला एकदिवसीय मालिकेमधून वगळण्यात आले.[१९]
- पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या एक दिवस आधी श्रीलंकेने इसुरू उदाना, तिक्षिल डी सिल्व्हा आणि सेक्कुगे प्रसन्ना यांना वगळले आणि त्यांच्या ऐवजी लाहिरू कुमार, विकूम संजय आणि जेफ्री वांदर्से यांना निवडण्यात आले.[२०]
- बोटाला झालेल्या दुखापतीमुळे डेव्हिड मिलरला उर्वरित तीन एकदिवसीय सामन्यांतून वगळले गेले.[२१]
सराव सामने
[संपादन]दक्षिण आफ्रिकी आमंत्रित एकादश वि श्रीलंकन्स
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंकन्स, फलंदाजी
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- ३ऱ्या दिवशी आकाशात चमकणाऱ्या वीजांमुळे सकाळच्या सत्रात खेळ थांबवण्यात आला.
- सुरंगा लकमलने (श्री) कसोटी मध्ये पहिल्यांदाच पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला.[२२]
- दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान श्रीलंकेच्या नुवान प्रदीपने घेतलेला हाशिम आमलाला पायचीत केले. कसोटी क्रिकेटमध्ये पायचीत होणारा तो १००००वा गडी ठरला.[२३][२४]
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, गोलंदाजी
- क्विंटन डी कॉकच्या (द) १,००० कसोटी धावा पूर्ण आणि श्रीलंकेविरुद्ध कसोटी शतक करणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकी यष्टिरक्षक.[२५][२६]
- लाहिरु कुमारचे (श्री) कसोटी डावात पहिल्यांदाचा ५ बळी.[२७]
- कागिसो रबाडाचे (द) ५० कसोटी बळी पूर्ण.[२६]
- व्हर्नॉन फिलांडरचे (द) १५० कसोटी बळी पूर्ण..[२६]
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- २ऱ्या दिवशी अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला.
- कसोटी पदार्पण: डुआन ऑलिव्हर (द)
- हाशिम आमलाचा (द) १००वा कसोटी सामना. १००व्या कसोटीमध्ये शतक झळकावणारा तो आठवा फलंदाज.[२८][२९]
- हाशिम आमला आणि जेपी ड्यूमिनी दरम्यानची २९२ धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेतर्फे श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट भागीदारी.[२९]
- तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचे १६ गडी बाद झाले, कसोटी क्रिकेटच्या एका दिवसात त्यांनी गमावलेले हे सर्वात जास्त गडी आहेत.[३०]
टी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १० षटकांचा खेळवण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: थेउनिस डी ब्रुएन, मंगालिसो मोसेहले, लुंगी न्गिदि, अँडिल फेहलुक्वायो, जॉन-जॉन स्मट्स (दक्षिण आफ्रिका) आणि तिक्षिल डी सिल्व्हा (श्रीलंका)
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: लक्षण संदकन (श्री)
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात पहिल्याच चेंडूवर बळी आणारा लक्षण संदकन हा १५ वा गोलंदाज.[३१]
३रा सामना
[संपादन]
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिणभ आफ्रिका, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: लाहिरू कुमार व लाहिरू मधुशंका (श्री)
- फाफ डू प्लेसीचा (द) १००वा एकदिवसीय सामना[३२]
- मधमाशांच्या थव्यामुळे श्रीलंकेच्या डावादरम्यान खेळाला १ तास उशीर झाला, परंतू षटके कमी झाली नाहीत.[३३]
- दक्षिण आफ्रिकेचा हा सलग बारावा एकदिवसीय विजय. १९९६-९७ च्या मोसमातील त्यांच्या सलग अकरा विजयांचा विक्रम मोडीत[३४]
४था सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- फाफ डू प्लेसीची एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेतर्फे दुसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३५]
- दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ही त्यांची श्रीलंकेविरुद्ध आणि ह्या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या.[३५]
- ए.बी. डी व्हिलीयर्सचे (द) ५०वे एकदिवसीय अर्धशतक.
५वा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
- हाशिम आमलाचे (द) ५० वे आंतरराष्ट्रीय शतक, कोणत्याही फलंदाजातर्फे तो सर्वात कमी डावांमध्ये ही कामगिरी केली (३४८).[३६]
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जास्त वेळा ३५० पेक्षा जास्त धावा करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा विक्रम (२४).[३६]
- दक्षिण आफ्रिकेची ही धावसंख्या श्रीलंकेविरुद्धची सर्वात मोठी धावसंख्या आहे.[३६]
- असेला गुणरत्नेचे (श्री) पहिले एकदिवसीय शतक.[९]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "दक्षिण आफ्रिका पुढील मोसमात ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंडचा दौरा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "रॅम स्लॅमला जागा करुन देण्यासाठी सीएसए तर्फे श्रीलंकेच्या दौर्यात बदल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डी व्हिलिर्स कसोटी कर्णधारपदावरुन पायउतार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "चेंडू फेरफारविरुद्धच्या अपीलामध्ये डू प्लेसीची हार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "दक्षिण आफ्रिका एकदिवसीय संघात डी व्हिलीयर्स, न्गिदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "डी व्हिलियर्सचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "वरचढ दक्षिण आफ्रिकेने मालिका जिंकली". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2017-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "प्रसन्नाने मिळवून दिला श्रीलंकेला मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "डी कॉक, आमला दक्षिण आफ्रिकेच्या विजयात चमकले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नवोदित थेउनिस डी ब्रुयन दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी नवोदित विकुम संजयची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये श्रीलंकेचे नेतृत्व तरंगा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिकेचे टी२० नेतृत्व बेहार्डीन करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिकेतील टी२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघात नवोदित तिक्षिल डी सिल्व्हा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "डुआन ऑलिव्हर कॉल्ड अप फॉलॉविंग ॲबट्स ॲक्स". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "ॲबट्स टेस्ट कारकीर्द ओव्हर ॲह हँपशायर मुव्ह इज कन्फर्म्ड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हाताच्या फ्रॅक्चरमुळे प्रदीप उर्वरित सामन्यांतून बाहेर; गुणतिलकची तब्येत बिघडली". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मॅथ्यूज, प्रदीप, गुणतिलक मायदेशी परतणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "पोटाच्या दुखण्याने [[लुंगी न्गिदी]] एकदिवसीय मालिकेला मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात कुमार, संजय, वांदर्से यांची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "उर्वरित श्रीलंका मालिकेतून मिलरला वगळले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिकेचा डाव २८६ धावांत संपल्यानंतर ॲबॉट, फिलांडरचा तडाखा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "कुकच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मार्शल'स एलबीडब्लु बनी, अँड अ डार्लिंग हू नेव्हर गॉट दॅट वे". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "एल्गारच्या शतकाने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "श्रीलंकेचा डाव कोसळला, रबाडा आणि फिलांडरची वैयक्तिक कामगिरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "लाहिरु कुमारचे कसोटी डावात पहिल्यांदाचा ५ बळी". न्यू झीलंड हेराल्ड (इंग्रजी भाषेत). 2017-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "आमला कुड बी लास्ट साऊथ आफ्रिकन टू १०० टेस्ट्स - ड्यू प्लेसी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "आमला जॉइन्स द 'हंड्रेड इन हंड्रेड्थ' क्लब". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "श्रीलंकाज बॅटिंग डिबॅकल". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "नोंदी: आंतरराष्ट्रीय टी२०: गोलंदाजीतील नोंदी: कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी". २३ जानेवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "मिसफायरिंग श्रीलंका फेस मस्ट-विन गेम ॲट हाय-स्कोरींग व्हेन्यू". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "द वाँडरर्स स्क्रँबल टू फाइंड प्लॅन बी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "डी व्हिलीयर्स टारगेट्स क्लिनिकल फिनीश टू द सिरिज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b "डू प्लेसी १८५: दक्षिण आफ्रिकेतर्फे दुसर्या सर्वाधिक वैयक्तिक धावा". इएसपीएन क्रिकइ्न्फो (इंग्रजी भाषेत). ८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ a b c "लागोपाठ ११ विजय आणि सर्वाधिक ३५०-पेक्षा जास्त एकदिवसीय धावसंख्या". इएसपीएन क्रिकइ्न्फो (इंग्रजी भाषेत). १२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
[संपादन]- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- CS1 errors: URL–wikilink conflict
- इ.स. २०१६ मधील खेळ
- इ.स. २०१७ मधील खेळ
- इ.स. २०१६ मधील क्रिकेट
- इ.स. २०१७ मधील क्रिकेट
- श्रीलंका क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे
- श्रीलंका क्रिकेट संघाचे परदेशी दौरे
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे