आयर्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१६-१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आयर्लंड क्रिकेट संघाचा सप्टेंबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिका दौरा केला. सदर दौर्‍यावर ते दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक असे एकूण दोन एकदिवसीय सामने खेळले.[१] दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०६ धावांनी तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ गडी राखून अशा दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना खूप मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा त्यांचा सामना हा सुधारित डीआरएस प्रणाली वापरली गेलेला पहिला सामना होता.[२]

संघ[संपादन]

आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड[३] ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[४] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[५]

सुरवातीला आयर्लंडविरुद्ध कर्णधार म्हणूण ए.बी. डी व्हिलियर्सची नेमणूक झाली होती. परंतु दुखापतीतून न सावरल्यामुळे त्याच्या जागी फाफ डू प्लेसीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली त्याशिवाय रायली रॉसूचा संघात समावेश करण्यात आला.[६] गुडघ्याच्या दुखापतीमुळे ख्रिस मॉरिस दोन महिने खेळू शकणार नाही. त्याच्या ऐवजी ड्वेन प्रीटोरियसला संघात स्थान मिळाले.[७]

दक्षिण आफ्रिका वि. आयर्लंड[संपादन]

२५ सप्टेंबर २०१६ (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३५४/५ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४८ (३०.५ षटके)
टेंबा बवुमा ११३ (१२३)
क्रेग यंग ३/८१ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका २०६ धावांनी विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: शॉन जॉर्ज (द) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: टेंबा बवुमा (द)


ऑस्ट्रेलिया वि. आयर्लंड[संपादन]

२५ सप्टेंबर २०१६ (दि/रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९८ (४३.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९९/१ (३०.१ षटके)
जॉन अँडरसन ३९ (४९)
ॲडम झाम्पा ३/३७ (१० षटके)
उस्मान ख्वाजा ८२* (७७)
टिम मुर्तघ १/२१ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी व ११९ चेंडू राखून विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी
पंच: बाँगनी जेले (द) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: उस्मान ख्वाजा (ऑ)


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "दक्षिण आफ्रिका पुढच्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा करणार" (इंग्रजी मजकूर). २१ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले. 
  2. ^ "दक्षिण आफ्रिका-आयर्लंड एकदिवसीय सामन्यामध्ये नवीन डीआरएस". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (इएसपीएन स्पोर्टस् मिडीया). २६ सप्टेंबर २०१६. २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. 
  3. ^ "इंटरकाँटिनेन्टल चषक आणि दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी डॉकरेलला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (इएसपीएन स्पोर्टस् मिडीया). २१ ऑगस्ट २०१६. २१ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले. 
  4. ^ "दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलिया संघात तीन नवोदितांची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (इएसपीएन स्पोर्टस् मिडीया). ५ सप्टेंबर २०१६. ५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. 
  5. ^ "ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका संघात फेहलुक्वायोची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (इएसपीएन स्पोर्टस् मिडीया). ६ सप्टेंबर २०१६. ६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. 
  6. ^ "आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्याला ए.बी. डी व्हिलियर्स मुकणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (इएसपीन स्पोर्ट मिडीया). २२ सप्टेंबर २०१६. २२ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. 
  7. ^ "गुडघ्याच्या दुखापतीमुळे मॉरिस दोन महिने संघाबाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर) (इएसपीन स्पोर्ट मिडीया). २३ सप्टेंबर २०१६. २३ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.