Jump to content

बिजू पटनायक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिजु पटनायक विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
बिजू पटनायक विमानतळ
भुवनेश्वर विमानतळ
आहसंवि: BBIआप्रविको: VEBS
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा भुवनेश्वर
समुद्रसपाटीपासून उंची १३८ फू / ४२ मी
गुणक (भौगोलिक) 20°14′40″N 085°49′04″E / 20.24444°N 85.81778°E / 20.24444; 85.81778
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२३ ४,५२४ १,३७९ डांबरी धावपट्टी
१४/३२ ७,३५९ २,२४३ डांबरी धावपट्टी

बिजू पटनायक विमानतळ (आहसंवि: BBIआप्रविको: VEBS), हा भारताच्या ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असलेला विमानतळ आहे. यास सर्वसामान्यपणे 'भुवनेश्वर विमानतळ' म्हणून ओळखतात. हा सध्या (२०१५ साली) ओरिसात असलेला एकमेव मोठा विमानतळ आहे. बिजू पटनायक हे ओरिसाचे माजी मुख्यमंत्री व एक अनुभवी वैमानिक व स्वातंत्र्य सेनानी होते.

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आराखडा

[संपादन]

ओरिसामध्ये जलदगतीने बदलणाऱ्या औद्योगिकीकरणाचा वेग बघून, भारतीय विमानतळ प्रधिकरणाने या विमानतळाचे संयुक्तरीत्या आंतरराष्ट्रीयकरण केले आहे. त्‍यासाठी भा.वि.प्रा.ने २५० कोटी रुपये खर्च केले. []. या विमानतळासाठी ओरिसा राज्य सरकारने बोइंग-७४७ विमान हाताळू शकण्यास आवश्यक असलेली ७० एकर (२,८०,००० मी) इतकी जमीन धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी दिली. या टर्मिनलला चकाकत्या काचेच्या भिंती आहेत. सामानाचे अंतर्भाग तपासण्यासाठी येथे क्ष-किरण मशीनची व्यवस्था आहे.

या विमानतळाची क्षमता प्रतितास ३० विमाने हाताळण्याइतकी सक्षम आहे. वाणिज्यिक संकुल, हॉटेल व इतर सोयी विमानतळाजवळच आहेत. एका वेळेस ५०० प्रवासी ही सुविधा उपभोगू शकतात.

भा.वि.प्र. ओरिसाच्या पश्चिम भागातीलत झार्सुगुडा येथे एक दुसरा विमानतळ करण्याच्या विचारात आहे. (इ.स. २००६ची बातमी)

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
इंडियन एअरलाइन्स चेन्नई, दिल्ली, मुंबई
इंडिगो एअरलाइन्स दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद
जेटलाईट दिल्ली, कोलकाता
किंगफिशर एअरलाइन्स दिल्ली, मुंबई, बंगळूर, कोलकाता

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भा.वि.प्रा. रु. २५० करोड भुवनेश्वर विमानतळात गुंतविणार (इंग्लिश मजकूर) जुलै २२,२००६

बाह्य दुवे

[संपादन]