डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एसीए-व्हिडीसीए मैदान
मैदान माहिती
स्थान विशाखापट्टणम
स्थापना २००३
आसनक्षमता २५,०००
मालक स्पोर्ट्स अथॉरिटी आंध्र प्रदेश

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा. एप्रिल, ०५ २००५:
भारत वि. पाकिस्तान
अंतिम ए.सा. ऑक्टोबर, १४ २०१४:
भारत वि. वेस्ट इंडीज
शेवटचा बदल २ डिसेंबर २०११
स्रोत: [१] (इंग्लिश मजकूर)

डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान तथा आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन-विशाखापट्टणम् जिल्हा क्रिकेट असोसिएशन क्रिकेट मैदान हे भारतातील विशाखापट्टणम् येथे असलेले बहुपयोगी मैदान आहे. एसीए-व्हिडीसीए मैदान विशाखापट्टणमच्याबाहेर टेकड्यांच्या मध्ये वसलेले आहे. आजवर या मैदानावर आपीएलच्या सामन्यांशीवाय ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना झाला आहे. मैदानाचे दुमजली स्टॅंड्सची मांडणी अशा प्रकारे करण्यात आली आहे की कुठेही बसून सामना पाहण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही

खेळवले गेलेले आंतरराष्ट्रीय सामने[संपादन]

कसोटी[संपादन]

आज पर्यंत या मैदानावर एकही कसोटी सामना खेळवला गेला नाही, परंतु कसोटी सामने खेळवण्याची परवानगी मैदानाकडे आहे. २०१६ साली होणारा भारत वि. इंग्लंडचा कसोटी सामने येथे खेळवला जाणार आहे.

एकदिवसीय[संपादन]

खेळविण्यात आलेले सामने खालीलप्रमाणे

दिनांक क्रिडासत्र संघ १ संघ २ विजेता फरक संपूर्ण धावफलक
मंगळवार, एप्रिल ५, २००५ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत ५८ धावा धावफलक
शनिवार, फेब्रुवारी १७, २००७ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
बुधवार, ऑक्टपबर २०, २०१० द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
शुक्रवार, डिसेंबर २, २०११ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
रविवार, नोव्हेंबर २४, २०१३ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २ गडी धावफलक
मंगळवार, ऑक्टोबर १४, २०१४ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सामना रद्द धावफलक

टी२०[संपादन]

दिनांक क्रिडासत्र संघ १ संघ २ विजेता फरक संपूर्ण धावफलक
शनिवार, सप्टेंबर ८, २०१२ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड सामना रद्द धावफलक
रविवार, फेब्रुवारी १४, २०१६ द्विदेशीय मालिका भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ९ गडी धावफलक

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 17°47′50.49″N 83°21′07.00″E / 17.7973583°N 83.3519444°E / 17.7973583; 83.3519444