"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
|||
ओळ १६३: | ओळ १६३: | ||
*महात्मा फुले दुर्मिळ वाङमय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा. गो. माळी |
*महात्मा फुले दुर्मिळ वाङमय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा. गो. माळी |
||
* महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण |
* महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण |
||
* महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान |
|||
* महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे |
|||
* महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो |
|||
* महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग.लेखक : विद्याकर वासुदेव भिडे |
|||
* महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे |
|||
* महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष.लेखक : भारत पाटणकर |
|||
* महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं. बा. सरदार |
|||
* महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक : धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ |
|||
* महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी |
|||
* महात्मा फुले (चरित्र) लेखक : शंकर कऱ्हाडे |
|||
* महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
००:०८, १० ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती
जोतीराव गोविंदराव फुले | |
---|---|
चित्र:Jyotibaphule.jpg जोतीराव गोविंदराव फुले | |
जन्म: | इ.स. १८२७ कटगुण, सातारा,महाराष्ट्र |
मृत्यू: | नोव्हेंबर २८, इ.स. १८९० पुणे, महाराष्ट्र |
वडील: | गोविंदराव |
आई: | चिमणाबाई |
पत्नी: | सावित्रीबाई फुले |
महात्मा जोतिबा फुले (इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते.
बालपण
त्यांचे मूळ गाव - कटगुण (सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून ते पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आले. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते.
जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमिळाला होता. जोतिबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.
जीवन
इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा
इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.
इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
इ.स. १८४८ - मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत ब्राम्हण वर्णीयांकडून अपमान झाला.
इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.
मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स' स्थापन केली.
इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोक
इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.
इ.स. १८५६ - जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.
इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.
इ.स. १८७५ - शेतकर्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली इ.स. १८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली.
२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रत रुजवण्यासाठी सत्यशोधक दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली.राजषी शाहू महाराजांनी समाजप्रबोधनासाठी मदत केली.ब्राम्हणेत्तर चळवळीने अवघा महाराष्ट्र जेधे जवळकर जोडीने ढवळून काढला. देशाचे दुश्मन हे त्यांचे पुस्तक प्रंचड गाजले.
प्रकाशित साहित्य
नाव | साहित्यप्रकार | लेखनकाळ |
तृतीय रत्न | नाटक | इ.स. १८५५ |
पवाडा राजे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा | पोवाडा | इ.स. १८६९ |
ब्राह्मणांचे कसब | लेखसंग्रह | इ.स. १८६९ |
गुलामगिरी | लेखसंग्रह | इ.स. १८७३ |
शेतकऱ्यांचा असूड | लेखसंग्रह | इ.स. १८८३ |
सत्सार | नियतकालिक | इ.स. १८८५ |
इशारा | लेखसंग्रह | इ.स. १८८५ |
सार्वजनिक सत्यधर्म | लेखसंग्रह | इ.स. १८८९ |
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
“ | विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। |
” |
जोतिबा फुले यांच्या जीवनावरील ग्रंथ, नाटक, चित्रपट वगैरे
- सत्यशोधक (नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे.
- महात्मा ज्योतिराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील
- महात्मा जोतिबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव मोरे
- महात्मा जोतिराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर
- महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर
- महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य
- महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले
- महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
- महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी
- महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे
- महात्मा जोतीराव फुले (चरित्र)लेखक : नागेश सुरवसे
- महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर
- महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक: ग.द. माळी
- महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे
- महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
- महात्मा ज्योतिराव फुले (चरित्र)लेखक : वसंत शांताराम देसाई
- पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार
- महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विट्ठलराव भागवत
- महात्मा ज्योतीबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर
- महात्मा ज्योतीबा फुले (चरित्र) लेखिका : गिरीजा कीर
- महात्मा ज्योतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते मनोविकास प्रकाशन
- महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन
- महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. मंगुडकर
- महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित) प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे
- महात्मा फुले टीका आणि टीकाकर. लेखक : नीलकंठ बोराडे
- महात्मा फुले दुर्मिळ वाङमय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा. गो. माळी
- महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण
- महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
- महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे
- महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो
- महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग.लेखक : विद्याकर वासुदेव भिडे
- महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे
- महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष.लेखक : भारत पाटणकर
- महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं. बा. सरदार
- महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक : धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ
- महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी
- महात्मा फुले (चरित्र) लेखक : शंकर कऱ्हाडे
- महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके