जानेवारी २०
Appearance
(२० जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २० वा किंवा लीप वर्षात २० वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]- १२६५ - इंग्लंडच्या संसदेची पहिली बैठक.
चौदावे शतक
[संपादन]- १३२० - व्लादिस्लॉ लोकिटेक पोलंडच्या राजेपदी.
- १३५६ - स्कॉटलंडचा राजा एडवर्ड बॅलियोलने पदत्याग केला.
पंधरावे शतक
[संपादन]- १५२३ - डेन्मार्क व नॉर्वेचा राजा क्रिस्चियन दुसरा यास पदत्याग करणे भाग पडले.
अठरावे शतक
[संपादन]- १७८३ - ब्रिटनने फ्रांस व स्पेनशी संधी केली. अमेरिकन क्रांती अधिकृतरित्या समाप्त.
- १७८८ - इंग्लंडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनाऱ्यावर उतरले. येथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८०१ - जॉन मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी.
- १८३९ - युंगेची लढई - चिली कडून पेरू व बॉलिव्हियाचा पराभव.
- १८४० - विलेम दुसरा नेदरलॅंड्सच्या राजेपदी.
- १८४१ - युनायटेड किंग्डमने हॉंग कॉंगचा ताबा घेतला.
विसावे शतक
[संपादन]- १९२१ - तुर्कस्तानचे पहिले संविधान अस्तित्वात आले.
- १९३६ - एडवर्ड आठवा युनायटेड किंग्डमच्या राजेपदी.
- १९३७ - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतरच्या सगळ्या अमेरिकन अध्यक्षांची सद्दी जानेवारी २०पासून सुरू होते. त्या यादी साठी येथे टिचकी द्या.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - बर्लिनमधील वॉन्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नाचा शेवटचा उपाय ठरवला.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने बर्लिन वर २,३०० टन बॉम्ब फेकले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - हंगेरीने दोस्त राष्ट्रांशी शस्त्रसंधी केली.
- १९५२ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी
- १९६३ - चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
- १९६९ - क्रॅब नेब्युलात प्रथमतः पल्सार दिसुन आला.
- १९८१ - रोनाल्ड रेगनने अमेरिकन अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर काही मिनिटात ईराणने ओलिस धरलेल्या ५२ व्यक्तिंना सोडले.
- १९९८ - पं. रवि शंकर यांना पोलार संगीत पुरस्कारजाहीर.
- १९९९ - गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
एकविसावे शतक
[संपादन]- २००९ - बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी.
जन्म
[संपादन]- २२५ - गोर्डियन तिसरा, रोमन सम्राट.
- १४३५ - अशिकागा योशिमासा, जपानी शोगन.
- १५५४ - सेबास्टियन, पोर्तुगालचा राजा.
- १७१६ - चार्ल्स तिसरा, स्पेनचा राजा.
- १७७५ - आंद्रे-मरी ॲंपियर, फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १७९८ - ऍन्सन जोन्स, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा पाचवा व शेवटचा अध्यक्ष.
- १८७१ - सर रतनजी जमसेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
- १८९६ - जॉर्ज बर्न्स, अमेरिकन अभिनेता.
- १८९८ - कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव’, गायक, अभिनेते व संगीतकार.
- १९०६ - ॲरिस्टॉटल ऑनासिस, ग्रीक उद्योगपती.
- १९१५ - गुलाम इशाक खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३० - बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर.
- १९४९ - गोरान पर्स्सन, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९५० - महामाने औस्माने, नायजरचा राष्ट्रध्यक्ष.
- १९६० - आपा शेर्पा, माऊंट एव्हरेस्टवर १९ वेळा यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक.
मृत्यू
[संपादन]- १४९२ - जॉन दुसरा, अरागॉनचा राजा.
- १६१२ - रुडोल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १६६६ - ऑस्ट्रियाची ऍना, फ्रांसचा राजा लुई तेरावा याची पत्नी.
- १७४५ - चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.
- १८१९ - चार्ल्स चौथा, स्पेनचा राजा.
- १८४८ - क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.
- १८९१ - डेव्हिड कालाकौआ, हवाईचा राजा.
- १९३६ - जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात.
- १९५१ - अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बापा’, गुजराती समाजसेवक.
- १९८० - कस्तुरभाई लालभाई, भारतीय उद्योगपती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक .
- १९८८ - खान अब्दुल गफार खान, पश्तुन नेता, स्वातंत्र्यसेनानी.
- १९९३ - ऑड्रे हेपबर्न, ॲंग्लो-डच अभिनेत्री.
- २००२ - रामेश्वरनाथ काओ, रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.
- २००५ - पर बोर्टेन, नॉर्वेचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जानेवारी २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - जानेवारी २२ - (जानेवारी महिना)