कस्तुरभाई लालभाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कस्तुरभाई लालभाई (१९ डिसेंबर, १८९४:अहमदाबाद, गुजरात, भारत - २० जानेवारी, १९८०:अहमदाबाद) हे भारतीय उद्योगपती होते. त्यांनी अरविंद मिल्ससह अनेक उद्योग सुरू केले.

पूर्वजीवन[संपादन]

कस्तुरभाईंचे कुटुंब अहमदाबादचे नगरशेठ होते.[१]

उद्योग[संपादन]

आपले वडील लालभाई दलपतभाई यांच्या मृत्यूनंतर कस्तुरभाईंना रायपूर मिल्स हा उद्योग वारसात मिळाला. १९२०मध्ये त्यांनी अशोक मिल्स सुरू केली. याशिवाय १९२८मध्ये अरुणा मिल्स, १९३१मध्ये अरविंद मिल्स आणि नूतन मिल्स तर १९३८ मध्ये अहमदाबाद न्यू कॉटन मिल्स हे उद्योग त्यांनी सुरू केले. १९३९च्या सुमारास अहमदाबादमधील कापडउद्योगात कस्तुरभाईंच्या उद्योगांचा २४ टक्के तर संपूर्ण भारतातली कापडउद्योगाचा १२ टक्के भाग होता. १९४८मध्ये कापडाचा काळाबाजार केल्याचा त्यांच्यावर ठपका आला. १९५२मध्ये त्यांनी डाह्यालाल पटेलांच्या भागीदारीत व अमेरिकन सायनेमाइडच्या सहकार्याने अतुल लिमिटेड ही कंपनी सुरू केली.

राजकारण[संपादन]

कस्तुरभाई १९२३मध्ये मध्यवर्ती विधिमंडळात निवडून गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते केंद्र सरकारच्या अनेक समित्यांवर होते.

पुरस्कार[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]