बर्लिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्लिन
Berlin
जर्मनी देशाची राजधानी

Berlin Montage 4.jpg
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने: शार्लटनबुर्ग राजवाडा, फर्नसेहटुर्म बर्लिन, राइशस्टाग, बर्लिन कॅथेड्रल, राष्ट्रीय गॅलरी, पोट्सडामर प्लाट्झ व ब्रांडेनबुर्ग फाटक
Flag of Berlin.svg
ध्वज
Coat of arms of Berlin.svg
चिन्ह
बर्लिन is located in जर्मनी
बर्लिन
बर्लिन
बर्लिनचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 52°30′2″N 13°23′56″E / 52.50056°N 13.39889°E / 52.50056; 13.39889गुणक: 52°30′2″N 13°23′56″E / 52.50056°N 13.39889°E / 52.50056; 13.39889

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य बर्लिन
स्थापना वर्ष अं. इ.स. ११९२
महापौर क्लाउस वोवेराइट
क्षेत्रफळ ८९१.८ चौ. किमी (३४४.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११२ फूट (३४ मी)
लोकसंख्या  (३० एप्रिल २०११[१])
  - शहर ३४,७१,७५६
  - घनता ३,८६९.४ /चौ. किमी (१०,०२२ /चौ. मैल)
  - महानगर ४४,२९,८४७
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
berlin.de


बर्लिन (जर्मन: Berlin) ही जर्मनी देशाची राजधानी व १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. सुमारे ३४.७ लाख लोकसंख्या असलेले बर्लिन हे जर्मनीमधील सर्वात मोठे शहर आहे.[१] बर्लिन शहर जर्मनीच्या ईशान्य भागात वसले असून ते बर्लिन-ब्रांडेनबुर्ग ह्या युरोपातील सर्वात मोठ्या महानगर क्षेत्राचे केंद्र आहे.

१२व्या शतकाच्या सुमारास स्थापन झालेल्या बर्लिनला युरोपाच्या इतिहासात विशेष स्थान आहे. आजवर बर्लिन ही प्रशियाच्या राजंत्राची (१७०१ - १९१८), जर्मन साम्राज्याची (१८७१ - १९१८), वाइमार प्रजासत्ताकाची (१९१९ - १९३३), नाझी जर्मनीची (१९३३ - १९४५) व आजच्या जर्मनी देशाची (१९९० - चालू) राजधानी राहिलेली आहे. दुसर्‍या महायुद्धामध्ये नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर बर्लिन शहराचे दोन तुकडे करण्यात आले. पूर्व बर्लिन हे पूर्व जर्मनीच्या राजधानीचे शहर तर पश्चिम बर्लिन हे पश्चिम जर्मनीच्या अधिपत्याखालील शहर हे दोन तुकडे बर्लिनच्या भिंतीने वेगळे करण्यात आले. १९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर बर्लिनची भिंत पाडून टाकण्यात आली व बर्लिन शहर पुन्हा एकदा एकसंध झाले.

एक जागतिक शहर असलेले बर्लिन हे राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या युरोपामधील एक प्रमुख शहर आहे.

शहररचना[संपादन]

दुसर्‍या महायुद्धामध्ये बरेचसे बेचिराख झालेले शहर १९५० व १९६० च्या दशकांमध्ये नव्याने बांधण्यात आले. ऐतिहासिक काळापासून अनेक राजवटींचे मुख्य शहर असल्यामुळे बर्लिनमध्ये विविध कलाप्रकाराच्या इमारती आहेत.

इतिहास[संपादन]

बाराव्या शतकामध्ये स्थापन झालेले बर्लिन हे हान्से ह्या संघामधील एक प्रमुख शहर होते. इ.स. १७०१ मध्ये प्रशियाच्या राजतंत्राच्या निर्माणानंतर बर्लिन हे राजधानीचे शहर बनले.

भूगोल[संपादन]

बर्लिन शहर जर्मनीच्या ईशान्या भागात पोलंड देशाच्या सीमेच्या ८५ किमी पश्चिमेला स्प्री नदीच्या काठांवर वसले आहे. ब्रांडेनबुर्ग राज्याने बर्लिनला सर्व बाजूंनी वेढून टाकले आहे.

हवामान[संपादन]

बर्लिन शहरामधील हवामान सौम्य व आर्द्र स्वरुपाचे आहे.

बर्लिन साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 15.0
(59)
17.0
(62.6)
23.0
(73.4)
27.0
(80.6)
33.0
(91.4)
36.0
(96.8)
37.8
(100)
35.0
(95)
32.0
(89.6)
25.0
(77)
18.0
(64.4)
15.0
(59)
37.8
(100)
सरासरी कमाल °से (°फॅ) 2.9
(37.2)
4.2
(39.6)
8.5
(47.3)
13.2
(55.8)
18.9
(66)
21.6
(70.9)
23.7
(74.7)
23.6
(74.5)
18.8
(65.8)
13.4
(56.1)
7.1
(44.8)
4.4
(39.9)
13.4
(56.1)
दैनंदिन °से (°फॅ) 0.5
(32.9)
1.4
(34.5)
4.9
(40.8)
8.7
(47.7)
14.0
(57.2)
17.0
(62.6)
19.0
(66.2)
18.9
(66)
14.7
(58.5)
9.9
(49.8)
4.7
(40.5)
2.0
(35.6)
9.6
(49.3)
सरासरी किमान °से (°फॅ) −1.9
(28.6)
−1.5
(29.3)
1.3
(34.3)
4.2
(39.6)
9.0
(48.2)
12.3
(54.1)
14.3
(57.7)
14.1
(57.4)
10.6
(51.1)
6.4
(43.5)
2.2
(36)
−0.4
(31.3)
5.9
(42.6)
विक्रमी किमान °से (°फॅ) −21.0
(−5.8)
−14.0
(6.8)
−13.0
(8.6)
−4.0
(24.8)
−1.0
(30.2)
4.0
(39.2)
7.0
(44.6)
7.0
(44.6)
0.0
(32)
−7.0
(19.4)
−9.0
(15.8)
−17.0
(1.4)
−21.0
(−5.8)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 42
(1.65)
33
(1.3)
41
(1.61)
37
(1.46)
54
(2.13)
69
(2.72)
56
(2.2)
58
(2.28)
45
(1.77)
37
(1.46)
44
(1.73)
55
(2.17)
571
(22.48)
सरासरी पावसाळी दिवस 10.0 8.0 9.1 7.8 8.9 9.8 8.4 7.9 7.8 7.6 9.6 11.4 106.3
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 46.5 73.5 120.9 159.0 220.1 222.0 217.0 210.8 156.0 111.6 51.0 37.2 १,६२५.६
स्रोत #1: विश्व हवामान संस्था (संयुक्त राष्ट्रे)[२]
स्रोत #2: HKO[३]

वाहतूक[संपादन]

कला[संपादन]

खेळ[संपादन]

येथील ऑलिंपिक स्टेडियममध्ये १९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा व २००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील अंतिम सामना खेळवण्यात आले होते.

१९३६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे बर्लिन हे यजमान शहर होते. तसेच २००६ फिफा विश्वचषक अंतिम सामना येथे खेळवला गेला होता. फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून फुसबॉल-बुंडेसलीगामध्ये खेळणारा हेर्था बे.एस.से. हा बर्लिनमधील प्रमुख फुटबॉल क्लब आहे.

शिक्षण[संपादन]

जुळी शहरे[संपादन]

जगातील १७ शहरे बर्लिनची अधिकृत जुळी शहरे आहेत.[४]

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: