जॉन मार्शल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन मार्शल

सर जॉन मार्शल (१९ मार्च, इ.स. १८७६ - १७ ऑगस्ट, इ.स. १९५८) हे एक ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ असून इ.स. १९०१ ते इ.स. १९३१ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा महानिदेशक होता. याने अनेक प्राचीन अवशेषांची नोंद केली. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे पुरातत्त्वीय उत्खनने करून सिंधु संस्कृती प्रकाशझोतात आणण्याच्या कामासाठी तो ओळखला जातो.[१] याशिवाय पाटणा, श्रावस्ती, तक्षशिला येथील उत्खननेही यानेच त्याच्या कार्यकाळात केली. दया राम साहनी यांचे शिष्य होते.

कार्य[संपादन]

ग्रीस, तुर्कस्थान आणि क्रिट येथील उत्खनन आणि संशोधनाचा मोठा अनुभव असल्याने ब्रिटिश भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने सर जॉन मार्शल याची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या महानिदेशकपदी नियुक्ती केली. आपल्या कारकिर्दीत त्याने पुरातन अवशेषांच्या जतनाबरोबरच उत्खननाचा मोठा कार्यक्रम अमलात आणला. ते एका ठिकाणी म्हणतात की," मोहनजोदडोच्या अवशेषात उभे राहिले असता आपणास जणूकाही लॅऺकेशावर सारख्या आधुनिक पण उध्वस्त झालेल्या शहरात वावरतो आहोत असे वाटते". नागरी संस्कृतीच्या अभ्यासाची आवड असल्याने प्राचीन भारतीय वाङ्मयात उल्लेखिलेल्या प्राचीन नगरींचे प्रमाण केवळ उत्खननाद्वारेच ठरविता येईल असे त्याचे मत होते.[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "हिस्ट्री - १९०१ ते १९४७" (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.