थायलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौरा, २०२१
थायलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेसाठी सराव व्हावा म्हणून १८ ते ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान चार ५० षटकांचे सामने आणि तीन अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी प्रथम झिम्बाब्वेचा दौरा केला. झिम्बाब्वेमध्ये मालिका झाल्यावर थायलंड संघ दक्षिण आफ्रिका महिला उभारता संघाविरुद्ध पाच ५० षटकांचे आणि तीन २० षटकांचे सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला.
झिम्बाब्वे महिला वि थायलंड महिला
[संपादन]थायलंड महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१ | |||||
झिम्बाब्वे महिला | थायलंड महिला | ||||
तारीख | १८ – ३० ऑगस्ट २०२१ | ||||
संघनायक | मेरी-ॲन मुसोंडा | नरुएमोल चैवाई | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | थायलंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चिपो मुगेरी (६३) | नत्ताकन चांतम (११०) | |||
सर्वाधिक बळी | लॉरेन त्शुमा (५) | नत्ताया बूचाथम (१०) |
थायलंड महिला संघ हरारेत १० ऑगस्ट २०२१ रोजी दाखल झाला. त्यानंतर एक आठवडा विलगीकरणात राहिल्यानंतर मालिकेला सुरुवात झाली. झिम्बाब्वे महिलांनी पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत विजयी सुरुवात केली. थायलंडने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत झिम्बाब्वेवर २२ धावांनी विजय मिळवत मालिका १-१ अश्या स्थितीत आणून ठेवली. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना थायलंडची १४/५ अशी स्थिती झालेली असताना कर्णधार नरुएमोल चैवाईच्या नाबाद शतकाच्या जोरावर थायलंडने सन्मानीत धावसंख्या उभारली, परंतु झिम्बाब्वेने पाच गडी राखून सामना जिंकला. चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात थायलंडने विजय मिळवला आणि चार ५० षटकांच्या सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत यजमान झिम्बाब्वेने पहिला सामना जिंकत पुन्हा एकदा विजयी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात मिळवलेला विजय हा झिम्बाब्वे महिलांचा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यातला सलग पंधरावा विजय होता. दुसरा सामना थायलंडने जिंकला आणि एक सामना शेष राहत मालिका १-१ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. तिसरा आणि अखेरचा निर्णायक सामना देखील २४ धावांनी जिंकत थायलंडने मालिका २-१ ने जिंकली.
५० षटकांचे सामने
[संपादन]महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
झिम्बाब्वे
१०७/९ (१९.३ षटके) | |
- नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.
- झिम्बाब्वे आणि थायलंड मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- थायलंडने झिम्बाब्वे मध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- झिम्बाब्वेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात थायलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२रा सामना
[संपादन]वि
|
झिम्बाब्वे
१०१ (१९.३ षटके) | |
- नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
- थायलंडने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- लॉरेन त्शुमा (झि) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
झिम्बाब्वे
१०७/७ (२० षटके) | |
- नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
- न्याशा ग्वानझुरा (झि) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला वि थायलंड महिला
[संपादन]थायलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१ | |||||
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला | थायलंड महिला | ||||
तारीख | ५ – १९ सप्टेंबर २०२१ | ||||
संघनायक | अँड्री स्टाइन | नरुएमोल चैवाई |
झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाबरोबरची मालिका संपताच थायलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाच ५० षटकांचे सामने आणि तीन २० षटकांचे अनौपचारिक सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत १ सप्टेंबर २०२१ रोजी दाखल झाला. ह्या मालिकेतील सर्व सामने हे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाच्याऐवजी दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला क्रिकेट संघाद्वारे खेळले गेले असल्याने सामन्यांना कोणताही आंतरराष्ट्रीय दर्जा नव्हता. सर्व सामने पॉचेफस्ट्रूम मधील सेन्वेस पार्क या मैदानावर खेळविण्यात आले.
५० षटकांचे सामने
[संपादन]वि
|
||
नत्ताकन चांतम ११३ (१४१)
लिआ जोन्स ३/५४ (१० षटके) |
ॲनेरी डेर्कसन ४७ (७६) नत्ताया बूचाथम ४/२९ (८.३ षटके) |
- नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
वि
|
थायलंड
२४३/५ (४८.४ षटके) | |
नत्ताकन चांतम १२० (१२६) बुलुमको बनेटी ३/५९ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला, फलंदाजी.
वि
|
थायलंड
२३१/८ (५० षटके) | |
नरुएमोल चैवाई ८० (१०४) डेल्मी टकर ३/३७ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला, फलंदाजी.
२० षटकांचे सामने
[संपादन]