Jump to content

इनोका रणवीरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इनोका रणवीरा (१८ फेब्रुवारी, इ.स. १९८६ - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजी करते.

नोव्हेंबर २०१५ मध्ये न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तिने शेवटच्या तीन चेंडूंवर तीन गडी बाद केले, आणि श्रीलंकेतर्फे हॅटट्रिक घेणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. [२]

१ डिसेंबर २०१६ रोजी तिला श्रीलंका क्रिकेटने सर्वोत्कृष्ट एकदिवसीय गोलंदाज, २०१६ या पुरस्कार दिला गेला. [३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "इनोका रणवीरा". इएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "इनोका रणवीराचा पहिल्या हॅटट्रीकसहीत नवा विक्रम". श्रीलंका मिरर (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "डायलॉग क्रिकेट अवॉर्ड्स २०१६: पारितोषिक विजेत्यांची नावे".