रुमाना अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Rumana Ahmed

रुमाना अहमद (बांग्ला: রুমানা আহমেদ) (२९ मे, इ.स. १९९१:खुलना, बांगलादेश - ) ही बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी अष्टपैलू क्रिकेटपटू आहे.[१][२] ती उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करते.

तिने २६ नोव्हेंबर २०११, रोजी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय, तर २८ ऑगस्ट २०१२ रोजी आयर्लंडविरुद्धच आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले. क्वांगचौ, चीन येथे पार पडलेल्या २०१० आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक विजेत्या संघाची रुमाना ही एक सदस्य होती. बांगलादेशचा संघ अंतिम सामना चीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध खेळला.[३][४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "बांगलादेश महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा रविवारपासून". द डेली स्टार (इंग्रजी भाषेत). १४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "महिला क्रिकेट संघ जाहीर" (Bengali भाषेत).
  3. ^ "बांगलादेश क्रिकेट आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवू शकतो". द डेली संग्राम (Bengali भाषेत). Archived from the original on 2014-02-26. १४ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ नदीम. "बांगलादेश महिला क्रिकेट संघ चीनचा दौरा करणार". खुलनान्युज.कॉम (Bengali भाषेत). Archived from the original on 2014-02-22. १४ फेब्रुवारी २०१६ रोजी पाहिले.