इ.स. २०२५
Appearance
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे - २०४० चे |
वर्षे: | २०२२ - २०२३ - २०२४ - २०२५ - २०२६ - २०२७ - २०२८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०२५ हे इसवी सनामधील २०२५वे, २१व्या शतकामधील २५वे तर २०२० च्या दशकामधील सहावे वर्ष आहे.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी
[संपादन]- १ जानेवारी :
- हंगेरी नंतर पोलंडने युरोपियन महासंघ परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले.
- बल्गेरिया आणि रोमेनिया या देशांनी जमिनी सिमा खुली करत शेंजेन क्षेत्रात सामील होण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
- लिक्टनस्टाइनने समलिंगी विवाह संबंधांना कायदेशीर मान्यता दिली, असे करणारे लिक्टनस्टाइन ३७वे राष्ट्र.
- पाच वर्षांच्या करार समाप्तीनंतर युक्रेनने देशात रशियन गॅस पुरवठा थांबवला, तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात युक्रेन पक्षीय देश म्हणून सामील झाला.
- संयुक्त राज्य अमेरिकेतील लुईझियाना राज्यामधील न्यू ऑर्लिन्स शहरात वाहनांवर हल्ला व गोळीबाराच्या घटनेत आरोपीसह १५ नागरिक ठार तर ३५ नागरिक जखमी झाले.
- माँटेनिग्रोमधील सेटिन्जे शहरात अतिरेकी हल्ल्यात १२ नागरिक ठार तर चार जखमी.
- करिन केलर-सटर यांनी स्वित्झर्लंडच्या १७७व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
- २ जानेवारी :
- जेनिफर गोंझालेझ-कोलोन यांनी पोर्तो रिकोच्या १९०व्या राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
- ३ जानेवारी :
- बेपत्ता भारतीय पत्रकार मुकेश चंद्रकार याचे शव छत्तीसगढ राज्यातील बिजापूर शहरात असलेल्या रस्ते बांधकाम कंत्राटदाराच्या कंपाऊंडमधील सेप्टिक टँकमध्ये आढळले.
- ४ जानेवारी :
- ऑस्ट्रियाचे २९वे चान्सलर कार्ल नेहॅमर यांनी राजीनामा दिला. त्यांच्याजागी ॲलेक्झांडर शॅलेनबर्ग यांची कार्यवाहक चान्सलर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- ५ जानेवारी :
- भारताच्या गुजरात राज्यातील पोरबंदर शहरात एका अभ्यासी उड्डाणादरम्यान भारतीय तटरक्षक दलाचे एच.ए.एल. ध्रुव हेलिकॉप्टर तटाजवळ कोसळले. तीन अधिकारी ठार.
- ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेट संघाचा ६ गडी राखून पराभव करत तब्बल ८ वर्षांनंतर बॉर्डर-गावस्कर चषक जिंकला.
- ६ जानेवारी :
- कॅनडाचे २३वे पंतप्रधान जस्टिन त्रूदो यांनी नऊ वर्ष पंतप्रधानपदी राहिल्यानंतर पंतप्रधानसह लिबरल पक्षाच्या गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. लिबरल पक्षाचे नवीन गटनेता (व पंतप्रधान) निवडीपश्चात त्रुदो पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याचे स्पष्ट केले.
- इंडोनेशिया ब्रिक्स परिषदेत १०वे राष्ट्र म्हणून सम्मिलित.
- भारतातील कर्नाटक राज्यामधील बंगळूर शहरात मानवी मेटाप्न्यूमोव्हायरस चा पहिला रुग्ण आढळला.
- अमेरिकन काँग्रेसने अधिकृतरित्या नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप व उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
- ७ जानेवारी :
- चीनच्या तिबेट मध्ये ७.१ रिश्टर स्केल प्रभावाचा भूकंप. १२६ नागरिक ठार तर २०१ जखमी.
- संयुक्त राज्य अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामधील लॉस एंजेलस शहरात जोरदार वारे आणि दीर्घकाळापर्यंत दुष्काळी परिस्थितीमुळे इतिहासातील सर्वात भीषण वणवा सुरु. असंख्य इमारतींना नुकसान पोचले, सर्वात जास्ती सनसेट बुलवॉर्ड इलाख्यात जास्ती नुकसान. वणव्यामुळे ७ नागरिक ठार तर १,७९,००० नागरिकांचे स्थलांतर.
- घानाचे १४वे राष्ट्रपती म्हणून दुसऱ्या कार्यकाळासाठी जॉन ड्रामानी महामा यांनी शपथ घेतली.
- ८ जानेवारी :
- जनरल जोसेफ ओन यांची संसदेद्वारा लेबनॉनचे १४वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड.
- ९ जानेवारी :
- भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील तिरुपती शहरातील तिरुपती बालाजी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी.
- संयुक्त राज्य अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्यावर वॉशिंग्टन डी.सी. मध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
मृत्यू
[संपादन]जानेवारी
[संपादन]१ जानेवारी
- इगोर पॉझनिच, ५७, स्लोव्हेनियाचा फुटबॉलपटू
- नोरा ओर्लांदी, ९१, इटालियन संगीतकार आणि गीतकार
- जॉन बी. ओ'रायली धाकटा, ७६, अमेरिकन राजकारणी व डीयरबॉर्न शहराचा माजी महापौर (२००७-२०२२)
संदर्भ
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |