माउंट सेंट हेलेन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
MSH82 st helens plume from harrys ridge 05-19-82.jpg

माउंट सेंट हेलेन्स तथा लूवाला-क्लाऊ (काउलित्झ भाषा:लावेट्लाट्ला; क्लिकिटॅट भाषा:लूविट) हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील जागृत ज्वालामुखी आहे. सिॲटलच्या दक्षिणेस १५४ किमी दक्षिणेस आणि पोर्टलंडच्या ८० किमी ईशान्येस असलेला हा ज्वालामुखी कॅस्केड पर्वतरांगेचा भाग आहे.

१८ मे, इ.स. १९८० रोजी या ज्वालामुखीचा स्फोट होउन त्यात ५७ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. २५० घरे, ४७ पूल, २४ किमी रेल्वेमार्ग आणि आणि २९८ किमी लांबीच्या हमरस्त्यांसह आसपासच्या प्रदेशाचे अतोनात आर्थिक आणि प्राकृतिक नुकसान झाले. स्फोटामुळे या डोंगराची उंची ९,६७७ फूटापासून ८,३६३ इतकी झाली. या स्फोटामुळे घसरलेल्या २.९ किमी घनफळाच्या डोंगराच्या तुकड्यामुळे रिश्टर मापनपद्धतीवर ५.१ तीव्रतेची नोंद असलेला भूकंप झाला आणि डोंगराच्या माथ्यावर १ मैल रुंदीचे भगदाड पडले.