उमर खय्याम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उमर खय्याम (पर्शियन عمر خیام;) (जन्म मे १८[१] १०४८[२] निशापूर, मृत्यू इ.स. ११३१) हे एक गणितज्ञ, ज्योतिषी, खगोलशास्त्रज्ञ आणि हिजरी पंचांगकार होते. याशिवाय त्यांच्या रुबायांमुळे ते जास्त लोकप्रिय झाले. त्यांचे पूर्ण नाव हजरत ग्यासुद्दीन अबुल फतेह उमर बिन इब्राहिम अल खय्यामी (पर्शियन غیاث الدین ابو الفتح عمر بن ابراهیم خیام نیشاپوری) असे होते.

कामगिरी[संपादन]

भारतीय बीजगणितावर लिहिलेल्या अल जब्र (बीजगणित) नावाच्या कित्येक ग्रंथांचे फ्रेंच भाषेत अनुवाद केले. हिजरी पंचांगात सुधारणा करण्यासाठी काबूलचा तुर्की सुलतान मलिक शहाने जी आठ विद्वानांची समिती नेमली होती त्याचा उमर खय्याम प्रमुख होते. आजचे सुधारीत हिजरी पंचांग ही उमर खय्याम यांची निर्मिती आहे. सुलतान मलिक शहानेच उमर खय्यामांना समरकंद येथे एक वेधशाळा बांधून दिली होती. उमर खय्याम यांच्या रुबाया अनेक भाषांत भाषांतरित झालेल्या आहेत.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ इनसायक्लोपिडिया ब्रिटानिका ऑनलाईन (इंग्रजी मजकूर)
  2. ^ सईद हुसेन नस्त्र. ॲन ॲंथॉलॉजी ऑफ फिलॉसॉफी इन पर्शिया (इंग्रजी भाषेत).