"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २६६: | ओळ २६६: | ||
== पर्यटन == |
|||
[[सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय]] हे औरंगाबाद येथील उद्यान आहे, जे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. |
|||
==हेसुद्धा पाहा== |
==हेसुद्धा पाहा== |
||
* मराठी विकिपीडिया [[दालन : मराठवाडा]] |
* मराठी विकिपीडिया [[दालन : मराठवाडा]] |
||
* ऐतिहासिक [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चा आढावा. |
* ऐतिहासिक [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चा आढावा. |
||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
२१:४०, २८ मे २०२० ची आवृत्ती
?मराठवाडा महाराष्ट्र • भारत | |
— विभाग — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ६४,८११ चौ. किमी |
जिल्हे | औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली |
लोकसंख्या • घनता साक्षरता |
१,५५,८९,२२३ (2001) • २४१/किमी२ ६८.९५ % |
मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.[१] कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नान्देड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केन्द्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्यास सन्तांची भूमी म्हटले जाते.
इतिहास
मराठवाडा हा मूलक देश म्हणून ओळखला जात असे. वैभवशाली आणि महान यादव मराठी साम्राज्याची स्थापना याच मराठवाड्यात झाली. विदर्भातील शिन्दखेडचे सरदार लखोजी जाधव हे याच यादव घराण्याचे वंशज यांची कन्या राजमाता जिजाऊ आणि वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे ते याच मातीतील होते. ४०० वर्षे याच मराठवाड्यातील देवगिरीवरून यादवांनी विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, माळवा, तेलंगण, बेळगाव, उत्तर कर्नाटक आणि निम्म्यापेक्षा जास्त भूभाग असलेल्या भारतावर राज्य केले.मराठवाडा निजामाच्या संस्थान चा भाग होता हे खरे असले तरी त्या आधी मुस्लीम राजवट येण्याआधी तेथे हजारो वर्ष मराठा साम्राज्य होते आणि जवळपास ४०० वर्ष देवगिरीच्या यादवांचे मराठी साम्राज्य होते आणि ते निम्म्यापेक्षा जास्त भारताच्या भागावर राज्य करत होते हे क्वचितच आणि तेही एका ओळीत सांगितले जाते.
इसवी सन १४०० पूर्वी हजारो वर्षे मराठवाड्यावर सातवाहन, चालुक्य, यादव या सारख्या मातब्बर मराठेशाहीतील मराठी लोकांचे राज्य होते हे पद्धतशीर लपवले जाते आणि नंतर चार शतके मुस्लिम राजवटीखाली मराठवाडा मुस्लिम राजवटीखाली आणि निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. निजामाने मराठवाड्यावर हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत ब्रिटिशांचे माण्डलिक राहून राज्य केले.[२] भारतीय स्वातन्त्र्यलढ्याच्या बरोबरीनेच हैदराबाद मुक्तिसंग्राम लढला गेला. स्वामी रामानन्दतिर्थ हे हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू होते. १७ सप्टेम्बर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. १ नोव्हेम्बर १९५६ पासून मराठवाडा विभाग मुम्बई राज्यास जोडण्यात आला. १ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला.
स्वातन्त्र्योत्तर काळात कॉंग्रेसचे नेते, शंकरराव चव्हाण यांचे प्रदीर्घ काळ मराठवाडा भागावर राजकीय प्रभुत्व होते. ते आधी महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री झाले व नन्तर त्यांनी भारतीय संघराज्याचे गृहमन्त्री, अर्थमन्त्री त्यादी केन्द्रीय मन्त्रिपदेही साम्भाळली. त्यांचा महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्रांचा गाढा अभ्यास होता.पैठणचा जायकवाडी जलसिंचन प्रकल्प हे त्यांचे विकास क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान आहे.
भौगोलिक स्थान
मुख्य शहरे
- औरंगाबाद : ही मराठवाड्याची राजधानी व प्रमुख औद्योगिक शहर आहे. हे शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथून मुम्बई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे.
- उस्मानाबाद : या शहरापासून जवळच धाराशिव लेणी आहेत या शहराजवळून भोगावती नदी वाहते .
- जालना : जालना शहर मराठवाड्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ व औद्योगिक केन्द्र आहे. या शहराला बियाणांची राजधानी असे म्हणतात. इथे स्टील उद्योग मोठ्या प्रमाणात आहे.
- नान्देड : हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. नांदेड येथे सचखण्ड गुरुद्वारा आहे.
- परभणी : परभणी येथे वसन्तराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. परभणी जंक्शन हे मराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.
- बीड : बीडला पाण्डवकाळात 'दुर्गावतीनगर' म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चम्पावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले 'चम्पावतीनगर' हे या शहराचे दुसरे नाव आहे. कंकालेश्वर हे बीड मधील ऐतिहासिक पुरातन भगवान शंकराचे मन्दिर आहे. हे चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे.मन्दिराचे दगडी बान्धकाम आहे.
- लातूर : लातूर हे मराठवाड्यातील प्रमुख शैक्षणिक केन्द्र आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणालीमुळे शिक्षण क्षेत्रात लातूर आकृतिबन्ध (पॅटर्न) निर्माण झाला आहे.
- हिंगोली : हिंगोली शहर कयाधू नदीच्या काठावर वसले आहे. हिंगोली येथील दसरा महोत्सव प्रसिद्ध आहे.
महत्त्वाची ठिकाणे
सन्त नामदेव महाराजांचे जन्मस्थान नरसी नामदेव, सन्त ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान आपेगाव, शिर्डीच्या साईबाबांचे जन्मगाव पाथ्री, सन्त एकनाथांचे पैठण, समर्थ रामदासांचे जन्मगाव जाम्ब, देवीचे शक्तिपीठ माहूर, ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ, औण्ढा-नागनाथ, घृष्णेश्वर मन्दिर, शीख धर्मीयांचा नान्देड येथील सचखण्ड गुरुद्वारा इत्यादी धार्मिक स्थाने या विभागात येतात.
- परळी वैजनाथ धार्मिक पर्यटन केन्द्र
- माहूर धार्मिक पर्यटन केन्द्र
- औण्ढा-नागनाथ धार्मिक पर्यटन केन्द्र
- धर्मापुरी - केदारेश्वर देवालय शिल्प स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना
- कल्हाली ता.कन्धार जि.नान्देड- निजामकालीन जहागिरीचे गाव. ३५ हुतात्म्याचे ग्रामकेन्द्र. [ब्रह्मदेवाचे देवस्थान]
नद्या
गोदावरी ही मराठवाड्यातील मुख्य नदी आहे. पूर्णा, पैनगंगा, सीना, शिवणा, मांजरा, दुधना या विभागातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत.
गोदावरी : मराठवाड्यातून गोदावरी ही प्रमुख नदी वाहते. काही अन्तरापर्यन्त तिने औरंगाबाद बीड, जालना व परभणी, बीड व जालना अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. बीड जिल्ह्यातील सिन्धफणा, वाण, सरस्वती, या गोदावरीच्या उपनद्या आहेत.
मांजरा : पाटोदा तालुक्यातील बालाघाटच्या डोंगराळ भागात उगम पावणारी मांजरा नदी सुरुवातीस उत्तर - दक्षिण - असा प्रवास करून जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहत जाऊन पुढे लातूर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा बराचसा प्रवास गोदावरीला काहीसा समान्तर असा होतो. बर्याच ठिकाणी या नदीने अहमदनगर-बीड, उस्मानाबाद-बीड व लातूर-बीड या जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. उगमापासून सुमारे ६१६ किलोमीटर प्रवास करून ही नदी पुढे नान्देड जिल्ह्यात कुण्डलवाडी गावाजवळ गोदावरीस मिळते. सिन्धफणा नदी पाटोदा तालुक्यात चिंचोली टेकड्यात उगम पावते. प्रथम उत्तरेकडे, नन्तर पूर्वेकडे व तदनन्तर पुन्हा उत्तरेकडे, किम्बहुना ईशान्येकडे प्रवास करीत माजलगाव तालुक्यात मंजरथजवळ गोदावरीस मिळते. बीड तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी बिन्दुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिन्धफणा नदीस मिळते. कुण्डलिका ही सिन्धफणेची आणखी एक उपनदी जिल्ह्यातच उगम पावून जिल्ह्यातच सिन्धफणा नदीस मिळते.
सीना : जिल्ह्याच्या व आष्टी तालुक्याच्याही नैर्ऋत्य सीमेवरून सीना नदी वाहते. काही अन्तरापर्यत तिने अहमदनगर व बीड जिल्ह्यांमधील नैसर्गिक सीमा म्हणून काम केले आहे. त्याच वेळी तिने अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका व बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका यांची सीमारेषाही स्पष्ट केली आहे. [३] कयाधु नदी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर-पूर्व सीमेवरून वाहताना वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा बनते.
प्रशासन
महसूल
मराठवाड्यातील पुढील आठही जिल्ह्यांचा मिळून औरंगाबाद महसुली विभाग तयार झाला आहे. विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. विभागीय आयुक्त हा या महसुली विभागाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असतो.
- औरंगाबाद जिल्हा
- उस्मानाबाद जिल्हा
- जालना जिल्हा
- नान्देड जिल्हा
- परभणी जिल्हा
- बीड जिल्हा
- लातूर जिल्हा
- हिंगोली जिल्हा
न्यायदान
सर्व जिल्ह्यांत जिल्हा न्यायालये आणि इतर न्यायालये आहेत. मुम्बई उच्च न्यायालयाचे खण्डपीठ औरंगाबाद येथे आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हे आणि लगतच्या अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांमधून उच्च न्यायालयात आलेल्या खटल्यांचे कामकाज येथे चालते.
अर्थव्यवस्था
शेती हाच मराठवाड्यातल्या लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. तान्दुळ, डाळी, तेलबिया आणि कापूस यावर आधारित प्रक्रिया उद्योग मराठवाड्यात विखुरलेले आहेत. औरंगाबाद, लातूर, जालना आणि नान्देड शहरांच्या परिसरात उद्योगीकरण झाले आहे. धातू, प्लॅस्टिक, वाहने आणि पेये या क्षेत्रांतील अनेक कारखाने इ. स. १९८० नन्तर मराठवाड्यात वाढले. जालना हा जिल्हा बियाण केन्द्र म्हणून प्रसिद्ध आहे.
समाजरचना आणि लोकजीवन
शिक्षण
औरंगाबादचे डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकर मराठवाडा विद्यापीठ, मौलाना आझाद महाविद्यालय आणि नांदेडचे स्वामी रामानन्द तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ही दोन शासननियन्त्रित आणि विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त सर्वसाधारण शिक्षणाची विद्यापीठे मराठवाड्यात आहेत. त्याशिवाय परभणी येथे मराठवाडा कृषि विद्यापीठ आहे. औरंगाबादचे शासकीय अभियान्त्रिकी महाविद्यालय, नान्देडचे श्री गुरुगोविन्दसिंह अभियान्त्रिकी महाविद्यालय आणि पीपल्स कॉलेज प्रसिद्ध आहे . इतर अनेक स्वायत्त शिक्षणसंस्था मराठवाड्यात आहेत.
डॉ.बाबासाहेब आम्बेडकर यांनी वेरूळ -अजिण्ठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेन्द्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिन्द महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातन्त्र्यानन्तर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्घाटन भारताचे पहिले पन्तप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला झाले.[४] सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आम्बेडकर मराठवाडा विद्यापीठ असा केला. प्रदेशातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. उस्मानाबाद येथे या विद्यापीठाचे उपकेन्द्र आहे. देशातील विद्यापीठांमध्ये पहिला नाट्यशास्त्र विभाग डॉ.बाबासाहेब आम्बेडकर मराठवाडा विद्यापीठात सुरू झाला.
नान्देड येथे मुख्यालय असलेल्या या विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेम्बर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यन्त चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानन्द तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.[५] प्रदेशातील नान्देड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. लातूर येथे विद्यापीठाचे उपकेन्द्र आहे.
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी परभणीत मराठवाडा विभागातील कृषि क्षेत्राच्या विशेष गरजा व लोकभावना लक्षात घेऊन मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. हरित क्रान्तीचे प्रणेते वसन्तराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील कृषि क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल १ जुलै २०१३ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार वसन्तराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ असा करण्यात आला.
शिक्षण – १९५६ साली परभणी येथे कृषि महाविद्यालयाच्या स्थापनेने सुरुवात होऊन आज विद्यापीठांतर्गत १२ घटक व ४३ संलग्न महाविद्यालये आहेत. तसेच ९ घटक व २० कृषि तन्त्र विद्यालये, ३३ संलग्न कृषि तन्त्र निकेतने आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना कृषिविषयक शिक्षण मिळते. विद्यापीठामध्ये कृषि, उद्यानविद्या, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, कृषि अभियान्त्रिकी, गृहविज्ञान, अन्नतन्त्रज्ञान यांत दोन वर्षाचा पदव्युत्तर, तर आचार्य पदवी कार्यक्रम हा कृषि शाखेच्या नऊ विषयांत, अन्नतन्त्रज्ञान शाखेतील पाच विषयांत, कृषि अभियान्त्रिकी शाखेतील चार विषयांत व गृह विज्ञान शाखेत एका विषयात राबविण्यात येतो.
संशोधन – विद्यापीठात राज्य शासन अनुदानित ३४ संशोधन योजना व २४ अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प कार्यरत असून आजपर्यंत सव्वाशेपेक्षा जास्त विविध पिकांचे वाण, पंचवीसपेक्षा जास्त कृषि औजारे व यन्त्रे विकसित करून शेतकऱ्यांसाठी सहाशेपेक्षा जास्त तन्त्रज्ञान शिफारसी प्रस्तुत केल्या आहेत.
विस्तार शिक्षण - विद्यापीठाचे तन्त्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य विस्तार शिक्षण गट (१), कृषि तन्त्रज्ञान माहिती केन्द्र (१), विभागीय कृषि विस्तार केन्द्र (४) तसेच ३ घटक व ८ अशासकीय कृषि विज्ञान केन्द्राद्वारे केले जाते. विद्यापीठाचे तन्त्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्यासाठी विद्यापीठ विविध नाविन्यपूर्ण विस्तार शिक्षण उपक्रम नियमित राबवीत असते.
दरवर्षी १८ मे रोजी खरीप पीक मेळावा (विद्यापीठ वर्धापनदिन) व १७ सप्टेम्बर या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी रबी पीक मेळावा घेण्यात येतो. शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामाबाबत मार्गदर्शन करून विद्यापीठाने तयार केलेल्या बियाणाचे वाटप केले जाते. सावित्रीबाई फुले जयन्ती निमित्त ३ जानेवारी रोजी दरवर्षी महिला शेतकरी मेळावा आयोजित होतो. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकरी बान्धव घेतात. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषि दैनन्दिनी, कृषि दिनदर्शिका, विविध विषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेतीभाती मासिक यांचे प्रकाशन होते.
नामांकित शिक्षण संस्था
- नवविकास मण्डळ शिक्षण संस्था
- नूतन शिक्षण संस्था
- भारतीय शिक्षण प्रसारक मण्डळ
- मराठवाडा शिक्षण प्रसारक मण्डळ
- योगेश्वरी शिक्षण संस्था, अम्बाजोगाई
- सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद.
जातवाद
मराठवाड्यात जातिभेद अतिशय बोकाळला आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. मराठवाड्यातील राजकीय कार्यकर्ते प्रत्येकाचा क्लोजअप काढून तो जातीच्या चौकटीत कायमचा फ्रेम करून टाकतात, असे म्हटले जाते. ज्या विचाराचे, भूमिकेचे वृत्तपत्र आहे त्या वैचारिक व्यासपीठावर त्या पत्रकाराला कायमचे बसवून टाकतात; दोस्त-दुश्मन अशी पात्ररचना बहाल करून टाकतात. आपण काही बरे, वेगळे लिहिले तरी ते त्यांच्या लेखी एक पवित्रा, बनाव, देखावाच असतो. त्यातून तो जन्माने ब्राह्मण असला की सम्पलेच सारे. नामान्तर चळवळीत का कोण जाणे, परन्तु ब्राह्मण शत्रू ठरले, ते आजतागायत तसेच राहिले.
संस्कृती
साहित्य आणि साहित्यिक
- मराठवाड्यातील डॉक्टर यू.म.पठाण यांनी मराठी सन्त साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. तर डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनीही मराठी सन्त साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली असून पुणे विद्यापीठातून सन्त मुक्ताई यांच्या जीवनावर पी.एचडी प्रदान केली आहे. आज त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. नरहर कुरुन्दकर हे मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. नाथराव नेरळकर यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. लक्ष्मीकान्त ताम्बोळी, फ.मुं. शिन्दे यांनी काव्यलेखन तर नरेन्द्र नाईक यांनी काव्य व कादम्बरी लेखन केले. त्यांची 'काळोखातील अग्निशिखा' कादम्बरी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहे .दैनिक मराठवाडाचे सम्पादक अनन्त भालेराव व दैनिक प्रजावाणी, नान्देडचे सम्पादक सुधाकर डोईफोडे यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले .डॉ. लक्ष्मण देशपाण्डे यांच्या ’वऱ्हाड निघालंय लण्डनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. डॉ. वा.ल. कुलकर्णी यांनीही मराठवाड्यातील अनेक साहित्यिक घडवले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आम्बेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभाग नावारूपास आणले.
पुस्तके
- ’असाही मराठवाडा’(मराठवाड्याचे सांस्कृतिक अन्तरंग दाखविणारा ग्रन्थ)-: लेखक : डॉ.किरण देशमुख (प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नान्देड)
- ’काळोखातील अग्निशिखा’ (ऐतिहासिक कादम्बरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन,पुणे) : हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादम्बरी-लेखक : नरेन्द्र नाईक
- ’नाटयधर्मी मराठवाडा ’ - लेखक : त्र्यम्बक महाजन.
- मराठवाडा : एक सांस्कृतिक मागोवा (अरुणचन्द्र पाठक)
- ’मराठवाडी माणसं’ - लेखक : यू. म. पठाण
- ’मराठवाड्यातील लोककथा’ - लेखक : यू.म. पठाण
- मराठवाड्यातील देवतांची रूपे (प्रा. डॉ. किरण देशमुख)
- ’मराठवाड्यातील शिलालेख’ - लेखक : यू.म. पठाण
- ’माझा महान मराठवाडा’ - लेखक : हेमकान्त महामुनी
मराठवाड्यात छापली जाणारी वृत्तपत्रे
- दै.न्याय टाईम्स (सम्पादक-बालकिशन सोनी)
- दै. मराठवाडा
- दै. लोकमत
- लोकसत्ता
- दै. सकाळ
- दै. दिव्य मराठी
- दै. एकमत
दै.चंपावतीपत्र दै. कार्यारंभ
संकीर्ण
मराठवाड्यातील नामांकित व्यक्ति
राजकारण
- अशोक चव्हाण
- केशरबाई क्षीरसागर
- केशवराव धोण्डगे
- गोपीनाथ मुण्डे
- गोविन्दभाई श्रॉफ
- जयसिंहराव गायकवाड पाटील
- नानाजी देशमुख
- प्रमोद महाजन
- स्वातन्त्र्यसैनिक बाबासाहेब सवनेकर
- बाबूरावज काळे
- मुकुन्दराव पेडगावकर
- डॉ. रफीक झकेरिया
- स्वामी रामानन्द तिर्थ
- वसन्तराव काळे
- विलासराव देशमुख
- शंकरराव चव्हाण
- शिवराज पाटील चाकुरकर
- शिवाजीराव निलंगेकर (माजी मुख्यमन्त्री)
- शिवाजीराव पण्डित
- सुन्दरराव सोळंके
मराठवाडा शिक्षक मतदार संघ
१९७४ साली मराठवाड्याला स्वतन्त्र शिक्षक मतदार संघ मिळाला.आज पर्यंत या मतदारसंघातून खालील शिक्षक आमदारांनी शिक्षकांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे.
- डी. के.देशमुख
- राजाभाऊ उदगीरकर
- पी.जी.दस्तुरकर
- प.म.पाटील
- वसन्तराव काळे
- विक्रम काळे
समाजकारण आणि ग्रामीण विकास
- पाचलेगावकर महाराज: संस्थापक मुक्तेश्वर दल, हिन्दू राष्ट्र सेना. सामाजिक कार्यकर्ते, हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे नेते.
- लक्ष्मण गायकवाड
- मच्छिन्द्र गोजमे
- ना.य. डोळे
- स्वातन्त्र्यसैनिक भगवन्तराव नाईक, [[हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात सहभाग, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ११ दिवस कारावास, इन्दिरा बचाव आन्दोलनात अटक, कल्हाली गावचे पहिले सरपंच, कन्धार प.स. चे पहिले सदस्य]]
- विठ्ठलराव देशपाण्डे
- प्रा. मधुकर मुण्डे
- विजयआण्णा बोराडे
व्यावसायिक
- नन्दकुमार धूत
- जवाहरलाल दर्डा
- मच्छिन्द्र चाटे
- रणजित देशमुख
- बद्रीनारायण बारवाले
मराठवाड्यातील साहित्यिक
- अनुराधा पाटील
- ऋषिकेश काम्बळे
- छाया महाजन
- डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे
- जयदेव डोळे
- प्रा. दत्ता भगत
- दादा गोरे
- दासू वैद्य
- नरहर कुरुन्दकर
- नरेन्द्र नाईक
- डॉ. गंगाधर पानतावणे
- पी. विठ्ठल
- प्र.ई. सोनकाम्बळे
- फ.मुं. शिन्दे
- बी. रघुनाथ
- कवि मुक्तविहारी
- यू.म. पठाण
- रमेश दीक्षित
- रविन्द्र किम्बहुने
- रावजी राठोड
- लक्ष्मीकान्त ताम्बोळी
- वा.रा. कान्त
- श्रीकान्न देशमुख
- डॉ. सरदारसिंह बैनाडे[६]
- सुधीर रसाळ
- डॉ. सूर्यनारायण रणसुभे
मराठवाड्यातील कलावन्त
- मकरन्द अनासपुरे
- चन्द्रकान्त कुलकर्णी
- मयूरी कांगो (हिन्दी चित्रपट अभिनेत्री)
- योगेश शिरसाठ
- डॉ. लक्ष्मण देशपाण्डे
- सन्दिप पाठक
मराठवाडा ही साधुसन्तांची भूमी आहे. धार्मिक संस्कृतिपालक
सन्त भगवानबाबा
सन्त वामनभाऊ
महन्त विठठ्ल महाराज शास्त्री (गहिनीनाथ गड)
महन्त अजिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड)
महन्त काशिनाथ महाराज शास्त्री (नागतळा)
ह भ प महादेव भाऊ शेकडे (मसोबाची वाडी)
- महन्त शिवाजी महाराज (नारायणगड)
- सन्दिपान महाराज शिन्दे हासेगावकर
- केशव महाराज उखळीकर परळी
- ज्ञानेश्वर दादा महाराज आपेगाव(माउलीचे)
- चैतन्य महाराज देगलूरकर
- माधवबुआ शास्त्री (अम्बाजोगाई)
- योगीराज महाराज पैठणकर
- स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे
- प्रकाश महाराज बोधले, डिकसळ
खेळाडू
- अंकित बावणे
- इक्बाल सिद्दिकी
- विजय झोल
- संजय बांगर
पत्रकार
अनन्त भालेराव
प्रशान्त दीक्षित
स.मा. गर्गे
पर्यटन
सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे औरंगाबाद येथील उद्यान आहे, जे मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय आहे.
हेसुद्धा पाहा
- मराठी विकिपीडिया दालन : मराठवाडा
- ऐतिहासिक हैदराबाद मुक्तिसंग्रामचा आढावा.
संदर्भ
बाह्य दुवे
महाराष्ट्राचे उपप्रांत |
---|
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ |
- ^ [२], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.
- ^ "मराठवाडा". ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.
- ^ "बीड". १७ ऑगस्ट, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]. - ^ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा इतिहास.
- ^ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संकेतस्थळ.
- ^ बैनाडे, सरदारसिंग. ज्येष्ठ कवी, लेखक व उत्तम सभा संचालक.