Jump to content

वैजनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(परळी-वैद्यनाथ या पानावरून पुनर्निर्देशित)
वैजनाथ

नाव: वैद्यनाथ मंदिर
जीर्णोद्धारक: अहिल्याबाई होळकर
निर्माण काल : अति प्राचीन
देवता: शंकर
वास्तुकला: हिंदू
स्थान: महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये


परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे.

परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.

आणखी एक वैजनाथ

[संपादन]

भारताच्या झारखंड राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हणले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे. रावण लंके जवळ जाताना दिशेप्रमाने प्रवास क्रमवारी नुसार महाराष्ट्र तील परळी हेच मुख्य व खरे बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे,