Jump to content

मुंबई शहर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख मुंबई जिल्ह्याविषयी आहे. मुंबई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
मुंबई जिल्ह्याचे स्थान

मुंबई जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असून क्षेत्रफळ ६७.७९ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या ३३,३८,०३१ इतकी आहे. जिल्ह्याची संपूर्ण लोकसंख्या नागरी आहे. मुंबई जिल्हा म्हणजेच मुंबई शहर. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या जिल्ह्यात विभागले गेले आहे. मुंबई जिल्ह्याची हद्द कुलाब्यापासून शीव/ माहिम पर्यंत आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर देखील आहे. संपूर्ण देश व परदेशातुन नागरिक मुंबईला येतात .

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- महात्मा फुले मार्केट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, फ्लोरा फाउंटन/फ्लोरा-फाऊंटन, जहांगीर कलादालन, छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह व चौपाटी बीच, मलबार हिल, मणिभवन, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली, सिद्धीविनायक मंदिर, जुहू बीच[१]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]