Jump to content

जयदेव डोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. जयदेव डोळे हे मराठीतले वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक आहेत. ते १ मे १९९८ ते १६ ऑक्टोबर १९९८ या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते. छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते पत्रकारिता विषयाचे सह-प्राध्यापक होते. विविध वृत्तपत्रांमधून प्रा. जयदेव डोळे यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.

प्रा. जयदेव डोळे यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • अ लिव्हिंग फेथ (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - असगर अली इंजिनिअर)
  • आरेसेस
  • खबर
  • जॉर्ज नेता, साथी, मित्र (संपादन: जयदेव डोळे आणि रंगा राचुरे)
  • प्राध्यापक लिमिटेड
  • बिहारचा बाजीगर लालूप्रसाद यादव (अनुवाद)
  • विरुद्ध
  • समाचार
  • हाल  
  • तोल (संपादन: जयदेव डोळे आणि देविदास तुळजापूरकर)

जयदेव डोळे यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • मराठवाडा साहित्य परिषदेचा २०१४ सालचा मराठवाड्यातील लेखक-कवींसाठी असलेला ‘नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कार’ प्रा. जयदेव डोळे यांच्या ‘विरुद्ध’ या ग्रंथास मिळाला आहे.
  • लोकसाहित्यिक भास्करराव जाधव यांच्या नावाचा 'काॅम्रेड जाधव स्मृतिपुरस्कारा'ने त्यांचा गौरव झाला आहे.

संदर्भ

[संपादन]