माणदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माणदेश हा महाराष्ट्राचा भाग आहे. या भागातून माण नदी वाहते, त्यामुळे याला माणदेश असे नाव पडले. माण नदीलाच माणगंगा म्हणतात. ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी आहे. या नदीचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई भागाच्या परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती सरकोळी येथे भीमा नदीला मिळते. या नदीच्या काठाला असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणतात. माणदेश च्या   मातीतील अनेक प्रकारची पुस्तके  माणदेश प्रकाशन स्वरूपात आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. लेखक जयराम शिंदे यांनी माणदेश प्रकाशन मधून सातारा जिल्हा माहिती पुस्तक लिहले असून त्यात माणदेश ची संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे

माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसर्‍या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्यस्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे.

मराठी साहित्यिक ग.दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या बंधूंचे बालपण माणदेशातील माडगूळ गावी गेले. व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिलेल्या माणदेशी माणसे या पुस्तकात या परिसरातील लोकांची व्यक्तिचित्रणे आहेत. शंकरराव खरात हे माणदेशातील थोर साहित्यिक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु होते.शंकरराव खरातांचे तराळअंतराळ हे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे.

काही माणदेशी भाषेतील प्रचलित शब्द[संपादन]

 • जितराफ = पशू पक्षी
 • वाईस उलीस = कमी
 • बावटा = खांदा
 • लय = जास्त, खूप
 • गॉड = छान
 • लागीर = दुःख,जखम
 • बासान = घरगुती भांडी
 • वाकळ = गोधडी
 • चांडा = मुद्दामहून कृती करणारा
 • झंपर = चोळी
 • पैरण = शर्ट/सदरा
 • चेंगाट = चिकट
 • बोड्या = जोड शब्द खुळ्या बोड्याच, अडाणी बोड्याचं
 • धाकला = लहान
 • ध्वाडी = पुतणी
 • इवाय = मुलीचे वडील आणि सासरा यांचे नाते
 • फुई = मोठी चुलती
 • नानी = लहान चुलती
 • व्हंजी = मोठी जावं
 • वन्स = भावजय
 • शेरड = शेळी
 • गुर = जनावरे
 • पाचुंदा = पाच पेंढ्या
 • टीम टीम = तीन चाकी गाडी
 • टमरेळ/चिंपाट = लहान डब्बा/बादली
 • सांचीपार = संध्याकाळ
 • व्हती = होती
 • न्हाय/न्हव = नाही
 • अमासनी = आम्हाला
 • व्हरा = गप्पा
 • कुरळी = नीमत्त
 • पाचकळ = अर्धसत्य
 • भसाकने = मधेच बोलणे
 • दादरा = पुल
 • पुंगास = घाणेरडा
 • बारका = लहान
 • टपाल = डोक्याचे केस
 • कावार = वादळ
 • वायदुळ/कायदुळ = लहान चक्राकार वादळ
 • मयंदाळ = खूप
 • हाडदन = जेवणे
 • निसळणे = धुणे
 • वलण = कपडे /ठेवण्याची वाळवण्याची दोरी
 • सरंबाड =बाजरी/ज्वारीची कणसेकाडल्यानंतर ची पेंडी
 • सरंबड = गावठी दारू
 • गुमान= गप्प बसून
 • हुमान = शब्द कोटी/कोडे
महाराष्ट्र
Maha div.png
कोकण · पश्चिम महाराष्ट्र · खानदेश · माणदेश · मराठवाडा · विदर्भ