औंढा नागनाथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
टोपणनाव: नागनाथ / नागेश्वर
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

१९° ३२′ ०४.३९″ N, ७७° ०२′ २२.४४″ E

भाषा मराठी
तहसील
पंचायत समिती

' हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव व तालुका' आहे. आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली, ) हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे. याचे प्राचीन नाव आमर्दक. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. 'आमर्दक सन्तान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.[१]

भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार होय. आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरू विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.

येथे नागनाथ या नावाने महाविद्यालय आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील काहीं गांवे

या तालुक्यातील गावांचा नकाशा

अंजनवाडा अंजनवाडी अनखळी असोंदा असोला असोला आजरसोंडा आमदरी उंडेगाव उखळी उमरा औंढा नागनाथ कंजारा काकडदाभा काठोडा तांडा कुंडकर पिंपरी केळी कोंडशी बुद्रूक गढाळा गांगलवाडी गोजेगाव गोळेगाव चिंचोली चिमेगाव चोंडी शहापूर जडगाव जलालदाभा जलालपूर जवळा जामगव्हाण जोडपिंपरी टाकळगाव ढेगज तपोवन दुघाळा तामटी तांडा दरेगाव दुरचुना देवाळा देवाळा दौडगाव धार नांदखेडा नांदगाव नागझरी नागेशवाडी नालेगाव निशाणा पांगरा पार्डी सावळी पिंपळदरी पिंपळा पुरजळ पूर पोटा पोटा खुर्द फुलदाभा बेरुळा बोरजा ब्राह्मणवाडा भोसी माथा मार्डी मूर्तीजापूर सावंगी मेथा येडूत येळी येहळेगाव रांजाळा राजदरी राजापूर रामेश्वर [रामेश्वर १] रूपूर लक्ष्मणनाईक तांडा लांडाळा लाख लोहरा खुर्द लोहरा बुद्रूक वगरवाडी वगरवाडी तांडा वडचुना वडद वसई वाळकी शिरड शहापूर शिरला संमगानाईक तांडा सारंगवाडी साळणा सावरखेडा सावळी खूर्द सावळी बुद्रूक सिद्धेश्‍वर सुकापूर सुरेगाव सूरवाडी सेंदूरसना सोनवाडी हिवरखेडा हिवराजाटू ........ई.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]


चुका उधृत करा: "रामेश्वर" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="रामेश्वर"/> खूण मिळाली नाही.