"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →शिक्षण |
|||
ओळ ७५: | ओळ ७५: | ||
===महाविद्यालये=== |
===महाविद्यालये=== |
||
* BYK/RYK/HPT |
* BYK/RYK/HPT |
||
(भिकुसा यमासा क्षत्रिय/रावजिसा यमासा क्षत्रिय/हंसराज प्रागजी ठाकरसी) |
|||
* N.D.M.V.P. कॉलेज |
* N.D.M.V.P. कॉलेज |
||
(Nashik District Maratha Vidya Prasarak) समाज |
|||
* पंचवटी कॉलेज |
* पंचवटी कॉलेज |
||
* बिटको कॉलेज ( नाशिक सिटी ) |
* बिटको कॉलेज ( नाशिक सिटी ) |
||
ओळ ८१: | ओळ ८३: | ||
* G.D. सावंत कॉलेज |
* G.D. सावंत कॉलेज |
||
* भोसला मिलिटरी कॉलेज |
* भोसला मिलिटरी कॉलेज |
||
* KTHM कॉलेज |
|||
('''K'''.R.'''T'''. Arts, B.'''H.''' Commerce & A.'''M'''. Science College) |
|||
{{multicol-break}} |
{{multicol-break}} |
||
२३:३५, ११ जून २०१३ ची आवृत्ती
? नाशिक महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
२६४.२३ चौ. किमी • १,००१ मी |
जिल्हा | नाशिक |
लोकसंख्या • घनता |
१३,६४,००० (२००५) • ५,१६२/किमी२ |
महापौर | यतीन वाघ (इ.स. २०१२) |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२५३ • एमएच १५ |
नाशिक( उच्चार (सहाय्य·माहिती)) अथवा नासिक महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे.
इतिहास
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.
भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.
ऐतिहासिक कालखंड
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले मोगलांचे सुरत बंदर लुटून परतत असताना, त्यांचा पाठलाग करणाऱ्या रणदुल्लाखानाशी त्यांची लढाई शहरापासून जवळच असलेल्या दिंडोरी येथे झाली. नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे शिवपूर्वकालीन व शिवकालीन किल्ले आहेत.
पेशवे घराण्यातील आनंदीबाई पेशवे येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.
आधुनिक काळातील इतिहास
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेऱ्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे. तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या खोलीवर हुतात्मा कर्वे व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत. याच इमारतीच्या आसपास दुष्ट ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा, याचा आराखडा ठरवला गेला. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता.
भारतीय चित्रपटाचा उगम नाशकाशी निगडित आहे; कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशकातच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.
सिंहस्थ कुंभ मेळा
हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी व चवथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन और नासिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.
नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुभ मेळा दर बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखो-करोडोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २००३साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०१५ साली.
हवामान
पावसाळ्याव्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान ४६.७° से. नोंदले गेले. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान ०.६° से. नोंदले गेले. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे [१].
अर्थकारण
महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे[ संदर्भ हवा ].
शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, महिंद्र अँड महिंद्र, मायको, क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तसेच नाशिक रोड येथे इंडियन करन्सी प्रेस हा नोटांचा छापखाना, तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस पासपोर्ट व स्टॅम्प छपाई होते.
शिक्षण
प्राथमिक व विशेष शिक्षण:-
नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे असतो. नाशिकमधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड / दिल्ली बोर्ड ) या संस्थांशी संलग्न असतात. तसेच पुणे बोर्डाचे (SSC/HSC) उपविभागीय कार्यालय नाशिकला आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ हे विद्यापीठे आहेत.
नाशिकची महत्त्वाची महाविद्यालये :-
विद्यालये
|
महाविद्यालये
(भिकुसा यमासा क्षत्रिय/रावजिसा यमासा क्षत्रिय/हंसराज प्रागजी ठाकरसी)
(Nashik District Maratha Vidya Prasarak) समाज
(K.R.T. Arts, B.H. Commerce & A.M. Science College) |
अभियांत्रिकी महाविद्यालये'
|
वैद्यकीय महाविद्यालये
|
धार्मिक स्थळे
- त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
- निवृत्तीनाथ महाराजची समाधी : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.
- अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
- सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
- नारोशंकर घंटा ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)
- गंगाघाट, पंचवटी
- राम कुंड - गोदावरी नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
- सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
- काळा राम मंदिर - काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर
- सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर आहे,
- सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे.
- कपालेश्वर मंदिर - नंदी नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)
- एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी
- मुक्तिधाम (नाशिक रोड)
- भक्तिधाम (पेठ नाका)
- नवश्या गणपती
- इच्छामणी गणपती (उपनगर )
- आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
- कालिका मंदिर, नाशिकचे ग्रामदैवत
- विल्होळी जैन मंदिर
- रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ (चांदीचा गणपती)
- वेद मंदिर - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना.
- चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहे.
- पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
- फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
- सोमेश्वरचा धबधबा गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.
- खंडोबाची टेकडी हे नाशिकपासून जवळच देवळाली कँपपाशी आहे.
- रामशेज किल्ला
- नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे.
- सिन्नर येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.
- कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२ कि.मी. अंतरावर आहे.
- नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य.
- अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या इमारतीची स्थापना केली.
मनोरंजन
नाट्यगृहे
चित्रपट गृहे
- फेम सिनेमा, पुणे-नाशिक रस्ता, नाशिक
- हेमलता रविवार पेठ
- सिनेमॅक्स कॉलेज रोड
- सिनेमॅक्स - रेजिमेंटल (नाशिक रोड)
- सिनेमॅक्स सिटी सेंटर मॉल
- दामोदर भद्रकाली
- विजयानंद भद्रकाली
- सर्कल - विकास अशोकस्तंभ
- मधुकर मेन रोड
- दिव्या बिग सिनेमा (त्रिमूर्ती चौक)
- महालक्ष्मी (दिंडोरी रोड)
- चित्रमंदिर मेन रोड
- अशोक (मालेगाव स्टँड, पंचवटी)
- अनुराधा (नाशिक रोड)
- आयनॉक्स (उदयोन्मुख)
आकाशवाणी केंद्रे
सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.
- ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४ एफ्. एम्.
- रेडिओ मिरची ९८.३ एफ्. एम्.
- रेड एफएम ९३.५ एफ्. एम्.
- रेडिओ विश्वास ९०.८ एफ्. एम्.
खरेदी
- मेन रोड,शालीमार व शिवाजी रोड हा जुन्या शहराचा मुख्य बाजार आहे.
- कॉलेज रोड हा नव्या शहराचा बाजार होत आहे.
- नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी प्रसिद्ध आहे.
- चांदीच्या दागिन्यांसाठीही शहर प्रसिद्ध आहे
- नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल उत्तर महाराष्ट्र सर्वात मोठा मॉल म्हणून प्रसिद्ध आहे.
वाहतुकीचे पर्याय
- हेसुद्धा पाहा: नाशिकचे सार्वजनिक परिवहन
- ऑटोरिक्षा, शहर परिवहन महामंडळाच्या बस
- राज्य परिवहन महामंडळाच्या बस
- लोहमार्गाने मुंबई, नागपूर, कोलकाता आणि दिल्ली या ठिकाणांसाठी दररोज गाड्या आहेत. नाशिक रोड हे कल्याण ते मनमाड या लोहमार्गावर येणारे स्थानक आहे. त्यामुळे मुंबईकडून यामार्गाने उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या नाशिक रोडहून जातात.
- २००८ पासून सुरू झालेल्या 'पुणे-मनमाड एक्स्प्रेस' (क्र.११०२५-११०२६) या गाडीमुळे नाशिक शहर एक्स्प्रेसद्वारे पुणे शहराशी जोडले आहे. तसेच 'पुणे-नाशिक' या प्रस्तावित लोहमार्गाला रेल्वे विभागाने अनुमती दिली असून, या मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे.
बसस्थानके
- '''मध्यवर्ती बस स्थानक''' (सी.बी.एस.) : शहरातील प्रमुख विभाग तसेच शहराजवळील गावे येथे जाणा-या 'सिटी बस' येथून सुटतात.
- महामार्ग बस स्थानक: मुंबई, शिर्डी व अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या बस या स्थानकावरून सुटतात.
- '''नवीन मध्यवर्ती बस स्थानक / ठक्कर बाजार बस स्थानक / नवीन सी.बी.एस.''' : हे नाशिक शहरातील मध्यवर्ती आणि मुख्य बसस्थानक आहे. येथून 'पुणे-जळगाव-सांगली-कोल्हापूर व महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरे' तसेच गुजरातमधील 'सुरत-बडोदा-अहमदाबाद' या ठिकाणी जाण्यास थेट बससेवा उपलब्ध आहे. विशेषतः 'नाशिक-पुणे' मार्गावर दर ३० मिनिटांनी निमाराम बस व पुष्कळ सामान्य बस उपलब्ध आहेत.
- नाशिक रोड बस स्थानक : हे बसस्थानक 'नाशिक रोड' रेल्वे स्थानकाशेजारी आहे. येथून नाशिक शहरातील प्रमुख उपनगरांकडे जाणाऱ्या-या 'सिटी बस' एस.टी. महामंडळाद्वारे सोडल्या जातात, (उदा.- पंचवटी, अंबड, सी.बी.एस., द्वारका इत्यादी) याव्यतिरिक्त 'शिर्डी-पुण्याकडे' जाणाऱ्या काही बस येथे थांबतात. रेल्वे स्थानकालगत असल्यामुळे, रेल्वेने नाशिकला येणारे प्रवासी येथून नाशिक शहरात जाऊ शकतात.
- मेळा बस स्थानक
रेल्वेस्थानके
- नाशिक रोड
- देवळाली कँप.
प्रसिद्ध व्यक्ती
- दादासाहेब फाळके
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
- कवी गोविंद - स्वातंत्र्य शाहीर (दरेकर)
- कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) ज्ञानपीठ विजेते आणि मराठी साहित्यातील आढळ तारा.
- वीर बापू गायधनी
- आर. डी. कर्पेकर
- वसंत कानेटकर
- अनंत कान्हेरे
- दादासाहेब पोतनीस (गावकरी)
- दादासाहेब गायकवाड
- वामनदादा कर्डक (लोककवी)
- गाडगेबाबा (समाजसुधारक)
संदर्भ
- ^ (इंग्लिश भाषेत) http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/nasik/004%20General/003%20Climate.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- (इंग्लिश भाषेत) http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/nasik/005%20History/001%20AncientPeriod.htm. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्लिश भाषेत) http://www.cafenasik.com/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)