वाईन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दोन वेगळ्या प्रकारच्या वायनी (डावीकडून), पांढरी व तांबडी.

वाईन (मराठी लेखनभेद: वाइन ; अनेकवचन: वायनी ; इंग्लिश: Wine ; इटालियन, स्पॅनिश: Vino, विनो; फ्रेंच: Vin; जर्मन: Wein ;) हे द्राक्षांच्या रसापासून बनवण्यात येणारे एक मद्य आहे. वाईन तयार करण्यासाठी द्राक्षांचा चोथा करून त्यात यीस्ट मिसळले जाते. द्राक्षांतील नैसर्गिक घटकांची यीस्टसोबत प्रक्रिया होऊन वाईन तयार होते.

पश्चिमात्य देशांमध्ये इ.स. पूर्व ६००० सालापासून वाईन बनवण्यात येत आहे. इटली, फ्रान्स, स्पेन, अमेरिकेची संयुक्त संस्थानेआर्जेन्टिना हे देश वाईन उत्पादनात अग्रेसर आहेत.

मर्यादेत व नियमित वाईनचे सेवन केल्यास हृदयरोगाची शक्यता कमी होते असा दावा केला जातो.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत