मुक्तिधाम
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मुक्तिधाम हे नाशिकरोड गावातील एक संगमरवरी मंदिर आहे. स्थानिक उद्योगपती दिवंगत श्री. जे. डी. चौहान-बिटको यांच्या देणगीतून हे देऊळ सन १९७१मध्ये तयार झाले. हे मंदिर खाजगीरीत्या एक ट्रस्ट चालवतो. येथील मुख्य मूर्ती ह्या श्रीराम,लक्ष्मण व सीता यांच्या असून त्यांच्या दोन्ही बाजूना इतर देव-देवतांच्या मूर्ती आहेत. यामध्ये मूळ देवतांच्या स्थानांनुरूप बनलेल्या १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहेत. मंदिराच्या भिंतींवर कृष्णाच्या जीवनावरील चित्रे आणि महाभारतील प्रसंग दर्शविणारी चित्रे आहेत.हे चि़त्रे प्रख्यात चित्रकार रघुबीर मुळगावकर यांनी रंगवले होते.तसेच गीतेचे अठरा अध्यायही लिहिलेले आहेत.