कुंभमेळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ब्रिटिश चित्रकार जे.एम.डब्ल्यू. टर्नर याने रेखलेले हरिद्वार कुंभ मेळ्याचे चित्र (निर्मितिकाळ: अंदाजे इ.स. १८५०)

कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे.

दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत अलाहाबाद (प्रयाग), उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा भरतो.

भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यांत हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. इ.स. २००१ साली पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात अधिकृत अंदाजांनुसार ३ ते ७ कोटी भाविकांनी भाग घेतला [१][२][३].

आख्यायिका व सांस्कृतिक संदर्भ[संपादन]

हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देवदानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुनासरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.

ज्योतिषीय संबंध[संपादन]

जेव्हा अमृतकुंभातून अमृत पृथ्वीवर पडले होते, तेव्हा जी ग्रहाची स्थिती होती तशीच स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जात असते. हा योग प्रत्येक बारा वर्षांनंतर येत असतो. अमृताचे थेंब पृथ्वीवर पडल्याने तेव्हा सूर्य, चंद्र, गुरूशनी या ग्रहांनी अमृतकुंभाच्या रक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे ज्या वर्षी ज्या राशीत सूर्य, चंद्र व गुरू अथवा शनी यांचा संयोग होतो, त्या वर्षी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते [ संदर्भ हवा ].

चित्रदालन[संपादन]

हेही पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. "मिल्यन्स बेद इन हिंदू फेस्टिवल (हिंदू उत्सवात लाखो लोकांचे स्नान)" (इंग्लिश मजकूर). बीबीसी न्यूज. ३ जानेवारी, इ.स. २००७. ३० जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 
  2. "कुंभ मेला पिक्चर्ड फ्रॉम स्पेस (अंतराळातून छायाचित्रित कुंभमेळा)" (इंग्लिश मजकूर). बीबीसी न्यूज. २६ जानेवारी, इ.स. २००१. ३० जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 
  3. "कुंभ मेल ({[लेखनाव". ) | प्रकाशक = न्यू सायंटिस्ट | लेखक = कॅरिंग्टन, डेमियन | दिनांक = २५ जानेवारी, इ.स. २००१ | अ‍ॅक्सेसदिनांक = ३० जानेवारी, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश }}


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.