नाशिकचे सार्वजनिक परिवहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाशिक येथे मध्यवर्ती बस स्थानक, महामार्ग बस स्थानक, ठक्कर बाजार बस स्थानक, नासिकरोड/नाशिकरोड बस स्थानक व मेळा बस स्थानक अशी प्रमुख स्थानके आहेत. शहरी परिवहनासाठी बस व रिक्षा हे प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत.

नाशिकरोड बस स्थानका जोडूनच रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे शहरात येण्यासाठी रेल्वे स्थानक जोडले गेले आहे. नाशिक येथील परिवहनासाठी एस्टी महामंडळाच्या बस बहुतेक रेल्वेंच्या वेळापत्रकांशी जोडण्यात आल्या आहेत. शहरातील बहुतेक सर्व भागांसाठी येथून बसेस सुटतात. तसेच येथे रिक्षा स्टॅंडही आहे. मात्र रिक्षा मीटरप्रमाणेच चालतील असे नाही. त्यामुळे प्रथम भाडे ठरवून घेणे योग्य. रात्री बेरात्री अवास्तव भाडे मागितले जाऊ शकते.

नाशिकरोड येथून सिडको भागात जाण्यासाठी पांडवलेणे, अंबड, गणेश चौक, लेखा नगर आदी बसेसने जाणे योग्य ठरावे. मात्र या बसेस मध्यवर्ती बस स्थानक सी. बी. एस.हून न जाता द्वारका येथून जातात.

चित्र:द्वारका वाहतूक बेट, नाशिक.JPG
[द्वारका वाहतूक बेट]

पंचवटीला जाणाऱ्या बसेसही द्वारका येथूनच जातात. यातील काही बसेस महामार्गावरून हिरे महाविद्यालया मार्गे पंचवटीतही जातात. महामार्ग बस स्थानक येथून मुंबईच्या कसारा लोकलला जोडणारी टॅक्सी सेवाही उपलब्ध आहे. तसेच पंचवटी स्टॅंडवरून मालेगाव धुळे आदी ठिकाणी जाणारी टॅक्सी सेवाही उपलब्ध असते. भाडे दर माणशी याप्रमाणे आकारले जाते.

पुणे, मुंबई व इतर सर्व बाहेरगावी जाणाऱ्या बहुतेक बसेस ठक्कर बाजार बस स्थानक व महामार्ग बस स्थानक, येथून सुटतात. मेळास्थानक हे त्र्यंबकेश्वरओझर येथे जाणाऱ्या बसेस साठी आहे.