रामकुंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राम कुंड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नाशिकमधील रामकुंड

रामकुंड हे पवित्र ठिकाण गोदावरी नदीच्या पात्रात नाशिक येथे आहे. येथे स्नान करण्याने पुण्य मिळते असे मानले जाते.राम कुंड हे गोदावरी नदीवरील एक महत्वाचे धार्मिक कुंड आहे. हिंदू धर्मीय या कुंडास अतिशय पवित्र जागा मानतात.हिंदु धर्मानुसार येथे जर स्नान केले तर माणसास पापमुक्ती प्राप्त होते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशातुन अमृताचे काही थेंब येथे पडले आणि राम कुंड पवित्र झाले अशी एक आख्यायिका आहे.हिंदू धर्मीय येथे अस्थी विसर्जन करण्यासाठी येतात. येथे जर आपल्या पुर्वजांच्या अस्थीचे विसर्जन केले तर त्या अस्थी पाण्यात विरघळतात आणि मृतत्म्यास मोक्ष मिळतो असा समज हिंदु धर्मीयांत आहे. येथे जवळच गंगा गोदावरीचे मंदीर आहे. दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा[१] पार पाडतो. कुंभमेळ्याच्या वेळी लाखो हिंदु धर्मीय येथे जमतात आणि स्नान करून पुण्यप्राप्ती मिळवतात.यावेळी अनेक साधु संत उपस्थिती लावतात. रामकुंडाच्या जवळच सीता कुंड आणि लक्ष्मण कुंड आहे. राम कुंडाचा रामयनातही उल्लेख आहे.