Jump to content

"अर्नाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3778583
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १९: ओळ १९:
==इतिहास==
==इतिहास==
{{साचा:विस्तार-किल्ला}}
{{साचा:विस्तार-किल्ला}}
चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग [[गुजरात|गुजरातचा]] सुलतान [[महमुद बेगडा]] याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. [[थोरले बाजीराव पेशवे|पहिल्या बाजीरावांनी]] या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग [[गुजरात|गुजरातचा]] सुलतान [[महमूद बेगडा]] याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७मध्ये मराठयांच्या ताब्यात आला. [[थोरले बाजीराव पेशवे|पहिल्या बाजीरावांनी]] या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.


==छायाचित्रे==
==छायाचित्रे==
ओळ २७: ओळ २७:


==गडावरील ठिकाणे==
==गडावरील ठिकाणे==
अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबुत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजुस दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजुला वाघ व हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर दरवाजावर खालील [[शिलालेख]] आढळतो:
अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले एकूण नऊ बुरूज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील [[शिलालेख]] आढळतो:


'[[बाजीराव]] अमात्य सुमती आज्ञापले शंकर!
'[[बाजीराव]] अमात्य सुमती आज्ञापिले शंकर!
पाश्चात्यासि वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे [[जंजिरा]]!!'
पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे [[जंजिरा]]!!'


या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा (की मलिक तुघाण) आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत होते. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावरून उभे राहिल्यावर डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरांत आहेत.
किल्ल्याच्या आत [[त्र्यंबकेश्वर]] व [[भवानी]]मातेचे मंदिर आहे. या शिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर [[कालिका]]मातेचे मंदिर आहे.

किल्ल्याच्या आत [[त्र्यंबकेश्वर|त्र्यंबकेश्वराचे]] व [[भवानी]]मातेची मंदिरे आहेत. या शिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर [[कालिका]]मातेचे मंदिर आहे.


==गडावर जाण्याच्या वाटा==
==गडावर जाण्याच्या वाटा==
पश्चिम रेल्वेच्या [[विरार]] पासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. असून तेथे जाण्यास एस. टी. बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्रकिनार्‍यापासून बोटीने किल्ल्यावर जावे लागते. ही बोट सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेउन जाते.
पश्चिम रेल्वेच्या [[विरार]] स्टेशनापासून अर्नाळा गाव अंदाजे १० कि.मी. असून तेथे जाण्यास एस. टी. बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्रकिनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. ह्या होड्या सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होडक्यांनी किल्ल्यावर जाता येते.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१३:१९, १५ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

अर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


अर्नाळा
नाव अर्नाळा
उंची
प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव अर्नाळा
डोंगररांग उत्तर कोंकण
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोंकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते, त्यामुळे येथून खाडीच्या सर्व प्रदेशावर येथून नजर ठेवता येत असे.

इतिहास

चारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७मध्ये मराठयांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

छायाचित्रे

गडावरील ठिकाणे

अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले एकूण नऊ बुरूज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:

'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!'

या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा (की मलिक तुघाण) आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत होते. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावरून उभे राहिल्यावर डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरांत आहेत.

किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचेभवानीमातेची मंदिरे आहेत. या शिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिकामातेचे मंदिर आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

पश्चिम रेल्वेच्या विरार स्टेशनापासून अर्नाळा गाव अंदाजे १० कि.मी. असून तेथे जाण्यास एस. टी. बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्रकिनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. ह्या होड्या सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होडक्यांनी किल्ल्यावर जाता येते.

बाह्य दुवे