Jump to content

वैतरणा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वैतरणा
सायलेंट हिल्स रिसॉर्ट वरुन दिसणारे वैतरणा नदीचे दृश्य
उगम त्र्यंबकेश्वर
मुख अरबी समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र , भारत
लांबी १५४ किमी (९६ मैल)
ह्या नदीस मिळते गोदावरी
उपनद्या तानसा, पिंजाळ , देहरजा , सूर्या
धरणे मोडकसागर ( खालचे वैतरणा ) धरण ,नाना शंकरशेट ( मधले वैतरणा ) धरण , वरचे वैतरणा धरण

वैतरणा नदी ही पालघर जिल्ह्यातून वाहते. ही त्र्यंबकेश्वरजवळ सह्याद्री पर्वतात उगम पावते. ही पश्चिम वाहिनी नदी अरबी समुद्राला मिळते. ही नदी त्र्यंबकेश्वराजवळच उगम पावणाऱ्या गोदावरीची उपनदी नाही. गोदावरी सह्याद्रीच्या पूर्वेला आहे, वैतरणा पश्चिमेला. हिच्यावर तीन धरणे आहेत. पहिले खालचे वैतरणा धरण (याला मोडक सागर म्हणतात), दुसरे मधले वैतरणा धरण (याला बाळासाहेब ठाकरे धरण

म्हणतात) आणि तिसरे इगतपुरीजवळ असलेले वरचे वैतरणा धरण. या तीनही धरणांतून मुंबईला पाणी पुरवठा होतो. या नदीच्या सुर्या,पिंजाळ,तानसा आणि देहेरजा या प्रमुख उपनद्या आहेत.

वैतरणेची लांबी 154 किमी असून ती कोकणातील प्रथम क्रमांकाची लांब नदी आहे. अरबी समुद्राला दातिवरे खाडीतून मिळते.

या धरणांव्यतिरिक्त मुंबईला पाणीपुरवठा करणारी, तानसा आणि भातसा हीही धरणे आहेत.