Jump to content

कार्तिकेय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मलेशियातील बटु गुहा (बटु केव्हज) येथे कार्तिकेय या देवतेची ही प्रचंड मूर्ती.

कार्तिकेय, कार्तिकस्वामी, मुरुगन किंवा मयूरी कंदसामी (तमिळ : முருகன்ऱ, मल्याळम : മുരുകന്‍) सुब्रह्मण्य, षडानन, स्कंद आदी नावाने देखील ओळखला जाणारा हा (कन्नड: ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ, तेलुगू: సుబ్రమణ్య స్వామి) एक हिंदू देव. आहे. कार्तिकेय शंकर आणि पार्वतीचा मोठा मुलगा तर गणपतीचा मोठा भाऊ आहे. हा देवांचा योद्धा सेनापती होता.

स्कंद षष्ठी या दिवशी कार्तिकेयाचा जन्म झाला असे मानले जाते. वर्षातील ज्या ज्या दिवशी शुक्ल पंचमीच्या दिवशीच षष्ठी असते त्या दिवशी स्कंद षष्ठी आहे असे समजतात. (अन्य षष्ठींना देखील स्कंद षष्ठी असू शकते.)

इतिहास

[संपादन]

काíतकेय या देवतेचा उल्लेख इ.स. दुसऱ्या शतकापासून दिसतो. कुषाण राजवटीमधल्या हुविष्क राजाच्या नाण्यांवर आपल्याला कार्तिकेय देव पहायला मिळतात. तसेच यौधेय राजांच्या नाण्यांवरसुद्धा हातात कोंबडा घेतलेल्या ब्रह्मण्यदेव अर्थात कार्तिकेय आढळतो.

सातारा जिल्ह्यातील अंभेरी, रहिमतपूर येथे श्री कार्तिकस्वामी यांचे नैसर्गिक वातावरणात खूप सुरेख असे मंदिर आहे.