Jump to content

गोवर्धन पूजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोवर्धन पूजा उत्तर भारतातील हिंदू समाजातील प्रथा आहे. ही पूजा मथुरेच्या आसपासचे लोक विशेषतः करतात. यासाठी बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.[]

गोवर्धन पूजा

त्रिपुरी पौर्णिमा अन्नकूट

[संपादन]
अन्नकूट परंपरा

महाराष्ट्र राज्यात कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला विठ्ठल मंदिरात किंवा शिव मंदिरात अन्नकूट केला जातो. या दिवशी भाविक विविध पक्वान्ने देवाला अर्पण करतात अशी प्रथा आहे .

संदर्भ

[संपादन]
  1. ^ टीम, एबीपी माझा वेब (2023-11-26). "Pune Dagadusheth Ganpati :त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 451 मिष्टान्नांचा महानैवेद्य". marathi.abplive.com. 2024-11-16 रोजी पाहिले.