तिरुवतिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्थानिक महिला नृत्य सादर करताना

तिरुवतिरा हा केरळ आणि तमिळनाडू येथे साजरा होणारा हिंदू सण आहे.[१] चिदंबरम या देवतेशी संबंधित हा उत्सव मानला जातो.चंद्र या देवतेशी या उत्सवाचा संबंध आहे असे मानले जाते.

उगम[संपादन]

तमिळ महिना मार्गझाई या काळात पौर्णिमेला हा सण साजरा होतो.[२] वर्षातील ही सर्वात मोठी रात्अर सते से मानले जाते. शिलालेख आणि जुन्या इतिहास संदर्भांच्यानुसार हा सण १५०० वर्ष प्राचीन आहे. या दिवशी मंदिरांमध्ये तिरुवतिरा सूक्ताचे पठन केले जाते.नटराज शिव आणि त्याची पत्नी पार्वती यांच्या मूर्ती मिरवणूक काढण्यासाठी मंदिराबाहेर प्रांगणात आणल्या जातात. तमिळनाडू मधील शिव मंदिरामधील हा सर्वात मोठा उत्सव आसतो.[३]

स्वरूप[संपादन]

थंडीच्या काळातील पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करून त्याचा नैवेद्य शिवाला दाखविणे, शंकराची नटराज रूपातील पूजा करणे, विशेष आरतीचे आयोजन करणे असे याचे स्वरूप असते. महाशिवरात्री उत्सवाशी याचे साधर्म्य असल्याचे दिसून येते.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ LLP, Adarsh Mobile Applications. "2022 Arudra Darshan date and time for New Delhi, NCT, India". Drikpanchang (इंग्रजी भाषेत). 2022-02-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Arudra Darisanam". www.templenet.com. 2022-02-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Live Chennai: Arudra Darisanam at Natarajar Temple, Chidambaram - Commenced with Flag Hoisting,Arudra Darisanam at Natarajar Temple, Chidambaram,Flag Hoisting,Chidambaram, Natarajar Temple". www.livechennai.com. 2022-02-19 रोजी पाहिले.
  4. ^ "Arudra Darshan 2021 Date: Know Significance and Celebrations Related to Thiruvathirai or Thiruvathira, the Cosmic Dance of Lord Shiva | 🙏🏻 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2021-12-20. 2022-02-23 रोजी पाहिले.