सोने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
७९ PtसोनेHg
Ag

Au

Au-TableImage.png
सर्वसाधारण गुणधर्म
नाव, चिन्ह, अणुक्रमांक सोने, Au, ७९
दृश्यरूप
रासायनिक श्रेणी संक्रामक (धातू)
अणुभार १९६.९७ ग्रॅ·मोल−१
भौतिक गुणधर्म
रंग पिवळा
स्थिती घन
घनता (० °से, १०१.३२५ कि.पा.)
१९.३ ग्रॅ/लि
विलयबिंदू १३३७ के
(१०६४ °से, १९४७ °फा)
क्वथनबिंदू ३१२९ के
(२८५६ °से, ५१७३ °फा)

सोने एक मौल्यवान धातू आहे. सोने हे मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक ७९ आहे (संज्ञा Au). चकाकी असलेला आणि सहज आकार देण्याजोगा मऊ धातू असल्याने सोन्याचा दागिन्यांमध्ये वापर होतो. जुन्या काळी सोन्याची नाणी प्रचारात होती. सोने हे समाज्यात प्रतिष्ठा वाढवणारी अशी वस्तू बनली गेली आहे.

कच्चे सोने

जगातील सर्व चलनांची तुलना सोन्याच्या किंमतीशी केली जाते, त्यामुळे सोन्याला अचल चलन असेही म्हणतात. सोन्याकडे एक सुरक्षित व निश्चित लाभ देणारी गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. अर्थव्यवस्थेला स्थैर्य यावे म्हणून देश सोन्याचा साठा करतात. सोने उत्तम विद्युतवाहक आहे. ते कधीही गंजत नाही. त्यापासून तारा किंवा पातळ पत्रा बनवता येतो. भारतासह जगातील इतर सर्व संस्कृती मध्ये विशेष करून महिला सोन्याचे दागिने परिधान करताना दिसतात. भारतामध्ये सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने हे सौभाग्याचे लेन म्हणून परिधान केले जातात. खरेतर सोन्याचे आयुर्वेदिक महत्त्व खूप मोठे आहे. सोने शरीरावर परिधान केल्याचे अनेक फायदे आहेत. तत्कालीन लोकांना, शास्त्रीय पद्धतीने हे सांगितले असते तर तयाना ते समजले नसते. म्हणूनचकीकाय त्याला धर्माची जोड दिली गेलीं असावी. परंतु, सोन्याचे दागिने परिधान केल्यामुळे भारतीय स्त्रियांचे आरोग्य चांगले राहाते, यात मात्र शंका नाही.

भारतात आजही गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी अनेक घरात केली जाते.

आढळ[संपादन]

सोने जगात अनेक ठिकाणी आढळते. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया सोने उत्पादक देश आहेत. अमेरिकेत उत्पादन नेवाडा राज्यात जास्त होते.

उपयोग[संपादन]

सोन्याचा वापर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योगांमध्ये केला जातो. वेगवेगळे जोड, तारांचे जोड यामध्ये सोन्याचा वापर केला जातो. वैद्यकात सोडियम ऑर्थिओमलेट वा ऑर्थिओग्लुकोज ही अल्पप्रमाणात सोन्याचा अंश असलेली औषधे बनवली गेली आहेत. सोन्याची काही समसंयुगे काही कर्करोगांच्या उपचारांसाठी वापरली जातात. त्याचा उपयोग शस्त्रक्रियांसाठीची उपकरणे, वैद्यकीय उपकरणे यातही होतो. इतिहास काळापासून दातांच्या उपचारांसाठी सोन्याचा वापर केलेला आढळतो. अंतराळ क्षेत्रात सोन्याचा वापर होतो. तेथे उष्णतेचे नियमन करण्यासाठी सोन्याचा पातळ थर दिलेली उपकरणे वापरली जातात.सोने मोल्यावन आहे पण मोल्यवान नितीमुल्या जोपासावे