सरस्वती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
श्री देवी सरस्वती
Saraswati.jpg
श्री सरस्वती देवी
वाहन मोर, हंस
मंत्र श्री सरस्वत्यै नमः
राजा रविवर्मा याने काढलेले चित्र

हिंदू पुराणांनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो. सरस्वतीचे वाहन हंस, पण जैन पुराणांमधून आणि लोककथांमधून सरस्वती वाहन मोर असल्याचे सांगितले जाते. (कार्तिकस्वामीचे वाहनही मोर आहे.) असे असले तरी चित्रात सरस्वती शुभ्र वस्त्रे नेसलेली आणि अनेकदा कमळावर बसलेली दाखवतात आणि मोर तिच्या आजूबाजूला असतो. हातात वीणा असते.

सरस्वतीचे वर्णन करणार सुप्रसिद्ध श्लोक :-

या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता |
या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्मच्युतशंकरप्रभृतिभिर्‌ देवै: सदा वन्दिता |
सा मां पातु सरस्वती भगवती निशेष्य जाड्या पहा ||