आदिवासी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा समुह होय. आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लॊकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात. भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी-व्यवसायात आणि निवडणुकांत उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी खास जागा ठेवल्या आहेत.भारतात ९ ऑगस्ट हा दरवर्षी आदिवासी दिवस म्हणून साजरा होतो. आदिवासी लोक भारताखेरीज जगातील अन्य देशांतही आहेत. इ. स. १९६२ साली शिलाँगमध्ये आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे- "एका समान भाषेचा वापर करणा-या, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणारा, एका विशिष्ट भू-प्रदेशात वास्तव्य करणा-या, तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेला, अक्षरओळख नसलेल्या व रक्तसंबंधावर आधारित, सामाजिक व राजकीय रीतिरिवाजांचे प्रामाणिक पालन करणा-या एकजिनसी गटाला 'आदिवासी समाज' म्हणताता. [१]

भारतातील आदिवासींच्या मुख्य जमाती[संपादन]

आदिवासींच्या बोली[संपादन]

आदिवासींच्या भाषा सर्वेक्षणात भारतात आर्यपूर्व काळात अस्तित्वात बोलल्या जाणाऱ्या अनेक मूळ आणि प्राचीनतम बोलीभाषा आढळल्या. त्या बोलीभाषा म्हणजे ढोरी(टोकरे कोळी) कोरकू, कोलामी, खारिया, गोंडी, गोरमाटी, ठाकरी, देहवाली, दो, परधानी, पावरी, भिलोरी, भूमिज, माडिया, मुंडारी, संथाली, सावरा, हलबी, वगैरे. यांतील बहुतेकांना लिपी नाही, आदिवासी समूहांकडून त्या फक्त बोलल्या जातात. परंतु त्या बोलणाऱ्यांची संख्या थोडी आहे. काही आदिवासी भाषांना लिपी आहे. उदाहरणार्थ संथाली. गोंडी ही द्रविडी भाषा कुटुंबातील प्रमुख आणि समृद्ध बोलीभाषा आहे.

आदिवासी लोकगीते[संपादन]

आदिवासी समूहांची संस्कृती समृद्ध असून त्यांची वैशिष्ट्यपूर्ण गीते, नृत्यप्रकार हा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

कातकरी गीत-

मुरमीचा गण जल्म झाला पातालात |
ते गण गेला कोणाच्या वंश्याला |
वंश्याला जर गेला नसता पूंजला मिलला असता |
पन आता कार न्हाई मिळत पूजाला ||
येथून गण झाला पुरा, म्हाईत असलं तर सांग रं सभेला || [२]

गोंड भजन-
अमर कंटक नाळ नर्बदाल वासी, केंज्या ग्यानी सारा जीवां पैदा किसी
आदिवासी भिल्ले कोयजाले, फाड ते होरके, बसे माझी ||
नर्मदाना येर उंजीकून अल्मस्त होरे बने मातुरे
कुम्राल इंदोर नर्बदाल असकेवासी ||

Watch High Quality Latest Adivasi Song

आदिवासींमधील काही ऐतिहासिक व्यक्ती[संपादन]

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • ^ नाडगोंडे, गुरुनाथ (१९८६). भारतीय आदिवासी. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन. pp. ३. 
  • ^ डॉ. बाबर सरोजिनी- एक होता राजा