कार्तिक शुद्ध एकादशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रबोधिनी एकादशी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह संपन्न केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेला भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागा होतो अशी कल्पना यामागे आहे. तुलसी विवाहात तुलसीचा विवाह कृष्णाशी (विष्णू) लावला जातो.

जर लागोपाठ दॊन दिवशी एकादशी येत असेल, तर पहिली प्रबोधिनी असते, ही स्मार्त एकादशी असते. दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असून त्या दिवशी चतुर्मास संपतो आणि तुळशी विवाहांना सुरुवात होते.

वर्षभर कधीही उपवास न करणारी मराठी माणसे आषाढी, कार्तिकी एकादशींना आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून उपास करतात.

प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी.

कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.