भारतीय संस्कृती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कथकली नृत्यातील कृष्णाचे पात्र

संस्कृती[संपादन]

संस्कृती या शब्दामध्ये सम् हा उपसर्ग आणि कृ हा संस्कृत धातू आहे. संस्कृतीचा अर्थ सर्वसमावेशक कृती असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर करायचा संस्कार.[१]

भारतीय संस्कृती ही देशाच्या इतिहासामुळे, विलक्षण भूगोलामुळे आणि जनतेतील वैविध्यामुळे आकारास आली आहे. शेजारच्या देशांतील चालीरीती, परंपरा व कल्पना सामावून घेत, भारतीय संस्कृतीने सिंधुसंस्कृतीदरम्यान जन्माला आलेले तसेच वैदिक काळात, दक्षिण भारतातील लोहयुगकाळात, बौद्ध धर्माच्या उद्भव आणि ऱ्हासाच्या काळात तसेच भारताचे सुवर्णयुग, मुसलमानी आक्रमण व युरोपियन देशांच्या वसाहतींदरम्यान झालेले बदल पचवूनदेखील स्व‌तःचे परंपरागत प्राचीनत्व टिकवून ठेवले आहे. भारतीय संस्कृतीने तिच्या इतिहासाने, अद्वितीय भौगोलिक रचनेने, वैविध्यपूर्ण लोकजीवनाने आणि शेजारील देशांच्या परंपरा व कल्पना स्वीकारून तसेच पुरातन परंपरा जपून आकार घेतला आहे.

भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे. भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे. वैदिक साहित्य हे भारतीय संस्कृतीचे मूळ साधन ग्रंथ आहेत. भारतीय संस्कृती समजून घेताना या धार्मिक साहित्याचा उपयोग होतो. वैदिक साहित्यामध्ये प्रामुख्याने वेदांचा. उपनिषदांचा. आरण्यक ग्रंथ यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

आशय[संपादन]

मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे तर स्वतःचा देह आणि मन बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वतःत बदल घडवून आणतो.संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.[२]

वैशिष्ट्ये[संपादन]

भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची वाटचाल पाहिला असता तिच्यात प्रमुख तीन वैशिष्ट्ये दिसून येतात- १.अखंडित परंपरा २.राजकीय व धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव ३.संस्कृतिसंघर्ष टाळून संस्कृतिसंगम करण्याची प्रवृत्ती.भारतीय संस्कृती कोश खंड नववा

ज्ञानाची उपासना[संपादन]

भारतीय संस्कृतीचा पाया "वेद" हा मानला जातो.वेद म्हणजे ज्ञान. ज्ञानाच्या अधिष्ठानावर आधारित अशी ही संस्कृती आहे.[३] वेद बंगल्यावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय. वेद आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जातात. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदांमधील काही सूक्त हे स्त्रियांनीही रचलेले आहेत. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत होती वैदिक वाड्मय अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेदात यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्य रूपामध्ये आहे. ऋग्वेदा सह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत. या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात म्हणजे जाणणे त्यापासून वेधही संज्ञा तयार झाली तिचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पटनाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असेही म्हणतात

संस्कृतीचे अन्य विषय[संपादन]

संस्कृतीच्या संदर्भात विविध संकल्पना मानल्या आहेत.- १.ऋणकल्पना- ही भारतीय समाजशास्त्रीय महत्त्वाची संकल्पना असून आश्रम व्यवस्थेशी या संकल्पनेची सांगड घातलेली दिसून येते.
२.आश्रम-मानवी आयुष्याचे चार भाग कल्पून त्या प्रत्येक भागाला आश्रम असे नाव दिले आहे.ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे हे चार आश्रम आहेत.
३.पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले असून नीतिशास्त्राच्या दृष्टीने यांना विशेष महत्त्व आहे.
४.चातुर्वर्ण्य-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण मानले गेले आहेत .

धर्म[संपादन]

मैत्रेय बुद्धांच्या एका पुतळ्याचे,भारताच्या लदाख राज्यात थिकसे मठानजिकचे दृष्य.

भारत हे हिंदू, बौद्ध, जैनशीख या धर्मांचे जन्मस्थान आहे.[४] आज हिंदू धर्म व बौद्ध धर्म हे जगातील अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे धर्म असून या दोन्ही धर्मांचे एकत्रित सुमारे २ अब्जांवर अनुयायी आहेत.[५][६][७] दुसऱ्या अनुमानानुसार बौद्ध धर्महिंदू धर्म हे जगातील अनुक्रमे दुसऱ्या व चौथ्या क्रमाकांचे धर्म असून या धर्मांची एकत्रित लोकसंख्या ही २.६ ते २.९ अब्ज आहे. काही अत्यंत गहन आध्यात्मिक समूह आणि संस्कृती आहेत अशा धार्मिक बाबतीत अत्यंत वैविध्यशील असणाऱ्या जगातील देशांपैकी भारत एक आहे. देशात बहुसंख्य लोकांच्या जीवनात धर्माची मध्यवर्ती व निश्चित अशी भूमिका आजही आहे. भारतात सुमारे ७९% लोकांचा धर्म हा हिंदू आहे आणि सुमारे १४% लोक इस्लाम धर्मीय आहेत.[८] तसेच भारतात ०.७% ते ६% बौद्ध धर्मीय, २.३% ख्रिश्चन धर्मीय, १.७% शीख धर्मीय व ०.४% जैन धर्मीय आहेत. प्राचीन भारतीय संस्कृती ही अनेक प्रवाहातून तयार होत गेलेली आहे. या देशाच्या संस्कृतीला आणि इतिहासाला बौद्धिक ज्ञानाची तात्त्विक परंपरां लाभलेली आहे. या धार्मिक संकल्पनांची पकड भारतीय जनमानसावर आहे. जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म असून या धर्माला स्वतंत्र तत्त्वज्ञान आणि वैभवशाली अशी परंपरा लाभलेली आहे. बौद्ध आणि जैन धर्म हे तत्कालीन सनातनी धर्माच्या विरुद्ध प्रतिक्रियात्मक स्वरूपामध्ये पुढे आलेले धर्म असून याधर्मांना वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. लोकशाही विचारांचा व मूल्यांचा प्रचार व प्रसार करणारे हे धर्म भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही लोकप्रिय ठरले आहेत. विशेषतः भारतात ६% असलेला बौद्ध धर्म जगभरात प्रभावशाली आहे. पारशी धर्म, ज्यू धर्म आणि बहाई या धर्माचेही भारतात अनुयायी आहेत पण या धर्मीयांची संख्या कमी आहे. भारतात सुमारे २६% (३१ कोटी) लोक हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत. भारतीय जीवनप्रवाहात धर्मांची भूमिका प्रबळ असली तरी सहिष्णुतेसह बाळगलेला निरीश्वरवादी किंवा ईश्वराविषयी अनास्था असलेले नास्तिक आणि निधर्मी लोक ३० लाखापेक्षा अधिक भारतात आहेत. भारती संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहे. उच्चप्रतीची विचारसरणी भारतीय संस्कृतीने जगाला प्रधान केलेले आहे. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत भारतीय संस्कृती ही अनेक स्थित्यंतरातून आणि समन्वयातून कायमच आपले अस्तित्व टिकून आहे. भारतीय धर्म आणि संस्कृतीचे वेगळेपण म्हणजे अनेक स्थित्यंतरं मध्ये आणि बदलाच्या काळातही आपले अस्तित्व कायम टिकून आहे.

धर्मात दोन भाग असतात.धर्मातील "यम" नावाचा जो भाग आहे तो बदलत नाही. यम म्हणजे तीनही त्रिकाळ न बदलणारा भाग. सत्य, प्रेम, अहिंसा, दया, परोपकार, ब्रह्मचर्य यांना यम असे म्हटले जाते. नियम म्हणजे जानवे घालणे, गंध लावणे इत्यादी. विद्वतरत्न के.ल दप्तरी यांनी म्हटले आहे की प्रत्येक युगात त्या त्या युगातील विचारवंत नवधर्म देत असत.

भारतीय संस्कृतीवरील पुस्तके[संपादन]

 • आपली शेती आपले सण (उज्ज्वला पुजारी)
 • Origins Of The Vedic Religion And Indus - Ghaggar Civilisation (इंग्रजी, लेखक - संजय सोनवणी)
 • कोकणची लोकसंस्कृती (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ए.एम.टी. जॅक्सन; मराठी अनुवाद - डाॅ. आसावरी उदय बापट)
 • कोकणातील कृषिसंस्कृती आणि लोकगीते (गोविंद काजरेकर)
 • खजुराहोचं देवसाम्राज्य (अनंत मोहिते)
 • नमस्कार माझा वेदमंदिरा (बालसाहित्य, लेखक - डॉ. प्रभाकर जोशी)
 • निफाड तालुक्यातील लोकसंस्कृती (मेघा जंगम)
 • बाहुबली आणि बदामी चालुक्य (मूळ इंग्रजी लेखक - प्रा. हंप. नागराजय्या; मराठी अनुवाद - प्रा.डाॅ. रेखा जैन)
 • पारधी लोकसंस्कृती (भाऊसाहेब राठोड)
 • पारंपरिक मराठी तमाशा आणि आधुनिक वगनाट्य (विश्वनाथ शिंदे)
 • प्राचीन भारतीय संस्कृती मूलाधारांच्या शोधात (गोपाळ चिपलकट्टी)
 • भारतीय एकात्मता - भाग १ ते ५ (डॉ. प्र.न. जोशी)
 • भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण (संपादक - अरुण जाखडे, मुख्य सर्वेक्षक - गणेश देवी)
 • भारतीय मूर्तिशास्त्र (एन.पी. जोशी)
 • भारतीय संस्कृती (साने गुरुजी)
 • भारतीय संस्कृती आणि आजचे वास्तव (रत्नाकर ठाकूर)
 • भारतीय संस्कृती आणि परंपरा (सुषमा नानोटी)
 • भारतीय संस्कृती कोश - १० खंड, प्रत्येक खंडाचे अनेक भाग (पं. महादेवशास्त्री जोशी)
 • मुलांचा संस्कृतिकोश खंड १ ते ४ (पं. महादेवशास्त्री जोशी)
 • भारतीय संस्कृतीचा पाया (श्रीअरविंद)
 • भारतीय संस्कृती प्रतीके आणि संस्कार (गणेश ल. केळकर)
 • मराठी भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृती (तरुजा भोसले)
 • मागोवा मिथकांचा (सुकन्या आगाशे)
 • Lighting the Way to My Heritage (इंग्रजी, लेखक - पद्मा शांडस, रवी गावकर)
 • लोककथा रूप आणि स्वरूप (क्रांती व्यवहारे, विद्या पाटील)
 • लोकरंगधारा (डॉ. प्रभाकर मांडे)
 • लोकसंस्कृतीचे मूलतत्त्व (डॉ. प्रभाकर मांडे)
 • लोकसंस्कृती दर्शन आणि चिंतन (डॉ. द.ता. भोसले)
 • वैदिक संस्कृतीचा विकास (महामहोपाध्याय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी)
 • संस्कृतीची प्रतीके (पं. महादेवशास्त्री जोशी)
 • संस्कृतीच्या प्रांगणात (पं. महादेवशास्त्री जोशी)
 • हिंदुधर्माची समीक्षा आणि सर्वधर्मसमीक्षा (महामहोपाध्याय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी)

बाह्य दुवे[संपादन]

साचा:Asia in topic

साचा:Life in India

 1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
 2. ^ भारतीय संस्कृती कोश खंड नववा
 3. ^ साने गुरुजी,भारतीय संस्कृती,व्हीनस प्रकाशन,१९६९
 4. ^ Outsourcing to India By Mark Kobayashi-Hillary
 5. ^ Finding Lost – By Nikki Stafford
 6. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2015-09-05. 2017-05-20 रोजी पाहिले.
 7. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2021-01-25. 2017-05-20 रोजी पाहिले.
 8. ^ "Religions Muslim" (PDF). Archived from the original (PDF) on 2006-05-23. 2006-06-01 रोजी पाहिले.